'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत मुंबई लोकलमध्ये झाली होती छेडछाड! स्वःतच सांगितले दुःख
South actress Malavika Mohanan : मालविका मोहनन ही दाक्षिणात्य चित्रपटातील एक गुणी अभिनेत्री, ती सद्या तिच्या आगामी 'राजभ' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. मालविका आणि प्रभास एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मालविका तशी गुणी अभिनेत्री आहे. जेव्हा ती महाविद्यालयीन जीवनात होती आणि मुंबई लोकलमधून प्रवास करत असतानाचा तिने एक भयावह किस्सा सांगितला. जो महिला सुरक्षेशी संबंधित आहे.

चित्रपट अभिनेत्री मालविका मोहनन हिने आपल्या भूतकाळातील काही कटु आठवणी शेअर केल्या आहेत. मुंबईतल्या कॉलेजच्या दिवसांबद्दल ती व्यक्त झाली अगदी मोकळेपणाने ती बोलली आणि तिने आपली वेदनाही व्यक्त केली.
मालविकासोबत घडलेला तो किस्सा काय होता?
मालविकासोबत घडलेल्या घटनेबद्दल तिने स्वःतच सांगितले. मालविकाने एका त्रासदायक घटनेचा उल्लेख केला. जो मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना घडला. एक अनोळखी व्यक्ती तिच्या जवळ आली आणि ग्रीलजवळून पाहत तिला निर्लज्जपणे किस मागितला.
रात्री साडेनऊ वाजता घडली होती घटना!
या घटनेबद्दल बोलताना मालविका म्हणाली, "मला आठवतं की मी आणि माझ्या दोन जवळच्या मैत्रिणी लोकल ट्रेनने परत येत होतो आणि मला वाटतं रात्रीचे 9.30 वाजले होते आणि आम्ही फर्स्ट क्लासमध्ये होतो. डब्बा पूर्णपणे रिकामा होता. खरं तर आमच्या तिघांशिवाय तिथे कोणीच नव्हतं. आम्ही खिडकीच्या ग्रीलजवळ बसलो होतो. एका माणसाने आम्हाला तिघी मुलींना बसल्याचं बघितलं, तो म्हणाला, "तुम्ही जवळ बसला. मला एक चुंबन द्या?'
मुंबई सुरक्षित आहे का? - मालविका म्हणते काय म्हणतेय
मालविका म्हणाली, "लोक अनेकदा म्हणतात की मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे. पण मला हा समज दुरुस्त करायचा आहे. आज माझी स्वतःची कार आणि ड्रायव्हर आहे. त्यामुळे मला मुंबई सुरक्षित आहे का असे कोणी विचारले तर मी हो म्हणेन.
मालविका मोहनन आणि प्रभासचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'द राजा साब'ची अधिकृत रिलीज डेट अजून आलेली नाही. हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे यापूर्वीचे वृत्त होते. पण नंतर चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे अर्धे काम बाकी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला आणखी काही कालावधी लागू शकतो.












Click it and Unblock the Notifications