दाक्षिणात्य अभिनेता अजितचा कुमारचा दुबईत भीषण अपघात, कारचे तुकडे, पाहा- थरारक VIDEO

Ajit Kumar Accident News : साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अजित कुमार यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. अजित कुमार यांचा दुबईत भीषण कार अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित कुमार 24H दुबई 2025 कार रेसिंगमध्ये भाग घेणार होते, ज्याची तयारी करत असताना त्यांचा अपघात झाला. यात त्यांच्या कारचे नुकसान झाले तर त्यांच्या तब्येतीविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अजित कुमारच्या कारला दुबईत अपघात

कार रेसिंगसाठी तयार असताना अजित कुमारचा अपघात झाला. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अभिनेत्याच्या कार अपघाताचा व्हिडिओ शेअर केला आहे. अपघातादरम्यान अभिनेत्याच्या कारचे तुकडे झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र या अपघातात अभिनेता सुखरूप बचावल्याचे बोलले जात आहे.

Ajith Kumar Accident

या व्हिडीओमध्ये अजित कुमारच्या कारचे तुकडे झाले आहेत. यानंतर कारचे तुकडे तुकडे झाल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. परंतु अभिनेत्याला वेळीच कारमधून बाहेर काढले जाते. सध्या चाहते अभिनेत्याला उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देत आहेत आणि त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

अजित कुमार यांच्या टीमने सध्यातरी या अभिनेत्याचे आरोग्य अपडेट शेअर केलेले नाही. अभिनेत्याने आपल्या टीमसोबत शर्यतीसाठी सरावही सुरू केला होता. तो कार रेसिंगचा मास्टर आहे. तो पोर्श 992 वर्गात त्याचे सहकारी मॅथ्यू डेट्री, फॅबियन डफीक्स आणि कॅमेरॉन मॅक्लिओड यांच्यासोबत स्पर्धा करणार होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+