सोनाली बेंद्रेनं का केलं होतं मायकल जॅक्शनचं स्वागत; राज ठाकरेंच्या पत्नीनं का केला होता तिला काॅल?
Sonali Bendre reveals why she welcomed Michael Jackson : सरफरोश चित्रपटातील नायिक म्हणून सोनाली बेंद्रेने जी भूमिका वटवली होती, ती भूमिका सिनेरसिकांच्या आजही लक्षात आहे, या भुमिकेने सोनाली बेंद्र महाराष्ट्रासह देशातील घराघरात पोहचली. हा सुपर डुपर चित्रपट ठरला तेव्हापासून सोनालीने मागे वळुन पाहिलेच नाही.
या गुणी अभिनेत्रीला जगप्रसिद्ध गायक आणि डान्सर मायकल जॅक्सनच्या स्वागताची संधी लाभली ती एकमात्र अशी अभिनेत्री आहे जिला ही संधी लाभली. भारतीय पारंपारिक पद्धतीने तिने मायकल जॅक्शनचे औक्षण करुन स्वागत केले होते,यावेळी तिने साडीपरिधान केली होती..पण तिने मायकल जॅक्सनचंस्वागत का केले, यामागील रहस्य तिने तब्बल २९ वर्षांनंतर सांगितले आहे.

काय आहे कारण
सोनाली बेंद्रेने एनआयला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की,मायकल जॅक्शनच्या शोची तिकीटे हवी होती, एकटीसाठी नव्हे तर तिच्या इतर मैत्रिणी आणि नातेवाईकांसाठीही तिला हे हवे होते. तिने मायकल जॅक्सनचे स्वागत करायला यामुळेच होकार दर्शवला होता.तिने नंतर हा शो बहिण,मैत्रिणीआणि इतर सर्वांसोबत पाहिला.
राज ठाकरेंच्या पत्नीने का केला होता सोनाली बेंद्रेला फोन
सोनाली बेंद्रे तेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर होती आणि एवढ्या मोठ्या स्टारकास्टला स्वागतासाठी बोलावणे सोपे नव्हते. अशा स्थितीत राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी खुद्द सोनालीला काॅल केला आणि म्हटलं की,तुला स्वागतासाठी यावचं लागेल,खरंतर सोनाली बेंद्रेची मावशी आणि शर्मिला ठाकरेंची आई या मैत्रिणी होत्या, त्यामुळे ती हो म्हणाली पण तिने एक अट ठेवली होती,म्हणजे नातेवाईक, मैत्रिणींना मायकल जॅक्शनच्या शोची तिकीटे मिळावे ही..
मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमातील व्हायरल व्हिडिओवर सोनाली बेंद्रेने भाष्य
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सोनाली बेंद्रेने राज ठाकरे आणि तिच्या एका व्हायरल व्हिडिओवर भाष्य केले. मुलाखतीत राज ठाकरेंसोबतच्या नात्याबाबत प्रश्न विचारला असता सोनाली बेंद्रे म्हणाली की, काय खरेच, मला तर शंका आहे.
व्हिडीओबाबत बोलायचे झाले तर मी माझ्या बहिणीसोबत बोलत होती, जी तिथेच उभी होती. मला माहिती नाही. जेव्हा लोक अशाप्रकारे बोलत असतात तेव्हा ते चांगले वाटत नाही. कारण त्यात कुटुंब सहभागी असते, अनेक लोक सहभागी असतात.
आमचे ठाकरे कुटुंबाशी गेली अनेक दशके नाते आहे, असं सोनाली बेंद्रेने सांगितले. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे, त्यांची सासू आणि माझी मावशी सर्व चांगल्या मैत्रिणी होत्या. शर्मिला ठाकरे यांच्या आईने 10 दिवस मला त्यांच्याकडे ठेवले होते कारण ती माझ्या आईची छोटी बहीण होती, असंही सोनाली बेंद्रेने सांगितले.












Click it and Unblock the Notifications