सोनाली बेंद्रेने राज ठाकरेंसोबतच्या प्रेमसंबंधाबद्दल मौन सोडले; म्हणाली-त्यांची आणि माझी फॅमिली...
Sonali Bendre On Raj Thackeray : बॉलिवूडमध्ये बऱ्याच ग्लॅमरस अभिनेत्री आहेत, त्यांच्या अफेअरबाबत विविध गॉसिप सुरूच असते. त्यातच 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत जोडलं गेलं होतं.
दरम्यान, 1996 साली मुंबईत पहिल्यांदा मायकल जॅक्शनच्या कार्यक्रमाचं आयोजन केले होते. या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकत्र दिसून आले.

त्यानंतर मुंबईतील एका कार्यक्रमात 30 वर्षांनी राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे भेटले होते. यादरम्यान राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रेचा एक व्हिडीओ सोशल मीडियात बराच व्हायरल झाला. त्यावर आता स्वत: सोनाली बेंद्रे हिने राज ठाकरेंसोबत्या नात्यावर पहिल्यांदाच उघडपणे खुलंपणे सांगितलं, ती काय म्हणाली जाणून घ्या सविस्तर...!
आमचे ठाकरे कुटुंबाशी नाते- सोनाली बेंद्रे
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना तिने अफेअरच्या अफवांना फेटाळून लावले आहे. मुलाखतीत राज ठाकरेंसोबतच्या नात्याबाबत प्रश्न विचारला असता सोनाली बेंद्रे म्हणाली की, काय खरेच, मला तर शंका आहे.
व्हिडीओबाबत बोलायचे झाले तर मी माझ्या बहिणीसोबत बोलत होती, जी तिथेच उभी होती. मला माहिती नाही. जेव्हा लोक अशाप्रकारे बोलत असतात तेव्हा ते चांगले वाटत नाही. कारण त्यात कुटुंब सहभागी असते, अनेक लोक सहभागी असतात.
आमचे ठाकरे कुटुंबाशी गेली अनेक दशके नाते आहे, असं सोनाली बेंद्रेने सांगितले. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे, त्यांची सासू आणि माझी मावशी सर्व चांगल्या मैत्रिणी होत्या. शर्मिला ठाकरे यांच्या आईने 10 दिवस मला त्यांच्याकडे ठेवले होते कारण ती माझ्या आईची छोटी बहीण होती, असंही सोनाली बेंद्रेने सांगितले.
मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत काल २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत, मुंबईत, छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी पुस्तकांचं भव्य प्रदर्शन आयोजित केलं आहे. त्याचं उदघाट्न झाल्यावर महाराष्ट्रातील मान्यवरांनी त्यांच्या आवडीची एक एक मराठी कविता सादर… pic.twitter.com/piTzk64OS0
— Raj Thackeray (@RajThackeray) March 1, 2025
फेब्रुवारी महिन्यात ३० वर्षानंतर राज-सोनाली आले होते एकत्र
या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे एकत्र दिसले होते. दोघांनीही एकत्र स्टेज शेअर केला होता. कार्यक्रमाची क्लिप बाहेर येताच त्यांच्या जुन्या प्रेमसंबंधाच्या बातम्या इंटरनेटवर व्हायरल होऊ लागल्या. 'जेव्हा दोघे ३० वर्षांनंतर भेटले' या कॅप्शनसह हा व्हिडिओ प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला.












Click it and Unblock the Notifications