चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता मुकुल देव यांचे निधन, 54व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mukul Dev passed away : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक व वेदनादायी बातमी पुढे आली आहे. प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते मुकुल देव यांचे काल रात्री उशिरा निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनाची बातमी कळताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली.

'सन ऑफ सरदार' चित्रपटात मुकुल देव यांच्यासोबत काम केलेले अभिनेते विंदू दारा सिंग यांनी इंडिया टुडेशी बोलताना अभिनेत्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचबरोबर मुकुल देवच्या जवळची मैत्रीण असलेली दीपशिखा नागपाल हिनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तिने अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि रेस्ट इन पीस लिहिले.
Rest in peace my brother #MukulDev ! The time spent with you will always be cherished and #SonOfSardaar2 will be your swansong where you will spread joy and happiness to the viewers and make them fall down laughing ! pic.twitter.com/oyj4j7kqGU
— Vindu Dara Singh (@RealVinduSingh) May 24, 2025
आजारी होता मुकुल, उपचार होते चालू
'सन ऑफ सरदार' चित्रपटात मुकुल देवसोबत काम केलेले अभिनेता विंदू दारा सिंग यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, मुकुल काही काळापासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यानंतर त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
दुःख व्यक्त करताना विंदू दारा सिंह पुढे म्हणाले की, मुकुल आता मोठ्या पडद्यावर दिसणार नाही. आईवडिलांच्या निधनानंतर, मुकुल स्वतःला वेगळे करत होता. तो घराबाहेरही पडला नाही आणि कोणालाही भेटला नाही. मुकुल गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो एक अद्भुत व्यक्ती होता आणि आपल्या सर्वांना त्याची आठवण येईल.












Click it and Unblock the Notifications