तावडेंची भेट अन् बिहारमध्ये निवडणूक लढवण्यावरुन मोठं वक्तव्य! काय म्हणाली गायिका मैथिली ठाकूर? वाचा

Singer Maithili Thakur Hints at Contesting Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच, आता राजकारणाच्या मैदानात लोकसंगीत आणि भक्ती संगीतातील लोकप्रिय चेहरा मैथिली ठाकूर यांच्या एन्ट्रीची चर्चा जोर धरू लागली आहे. मैथिली ठाकूर यांनी नुकत्याच भाजपच्या दोन बड्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर, निवडणूक लढवण्याच्या चर्चांना स्वतःच दुजोरा दिला आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट घेऊन बिहारच्या भविष्यावर चर्चा केल्याचे मैथिली ठाकूर यांनी स्पष्ट केले.

Singer Maithili Thakur

'माझ्या गावातून निवडणूक लढवायला आवडेल'

राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांवर बोलताना मैथिली ठाकूर एनआयशी बोलताना म्हणाली, "मी देखील टीव्हीवर हेच सगळे बघत आहे. मी नुकतीच बिहारला भेट दिली, जिथे नित्यानंद राय आणि विनोद तावडे यांची भेट झाली. बिहारच्या भविष्यावर आमची चर्चा झाली. सध्या कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण पुढे काय होते, ते बघू."

निवडणूक लढवल्यास कुठून उभे राहणार, या प्रश्नावर तिने आपल्या जन्मभूमीबद्दलचे प्रेम व्यक्त केले. "मला माझ्या गावच्या मतदारसंघातून उभे राहायला आवडेल, कारण त्या जागेबद्दल मला विशेष ओढ आणि आपुलकी आहे."

मैथिली ठाकूर मूळच्या मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी येथील आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्या मिथिलांचल भागातील अलीनगर किंवा बेनीपट्टी यापैकी एका जागेवरून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'आत्ता कोणाला पाठिंबा, हे सांगणार नाही!'

बिहार निवडणुकीत त्या कोणत्या पक्षाला पाठिंबा देतील, या प्रश्नावर मात्र त्यांनी थेट बोलणे टाळले. "यावर मला सध्या कोणतीही टिप्पणी करायची नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, देशाच्या विकासासाठी योगदान देण्याची आपली इच्छा त्यांनी पुन्हा व्यक्त केली. "मी देशाच्या विकासासाठी शक्य ते सर्व योगदान देण्यासाठी ठाम आहे."

मैथिली ठाकूर यांच्या राजकीय एन्ट्रीमुळे बिहार निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. भाजपकडून त्यांना युवा आणि मिथिलांचल भागातील एक प्रभावी चेहरा म्हणून संधी मिळू शकते.

मैथिली ठाकूरबद्दल काही प्रमुख माहिती

२५ जुलै २००० रोजी बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी येथे झाला. तिने तिच्या आजोबा आणि वडिलांकडून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. तिने हिंदी, बंगाली, मराठी, उर्दू, पंजाबी, तमिळ, इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

मैथिली ठाकूर हिने २०१७ मध्ये कलर्स टीव्हीवरील 'रायझिंग स्टार' या गायन स्पर्धेच्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेतला होता आणि ती उपविजेती ठरली होती.

  • निवडणूक आयोगाने तिला बिहारची 'स्टेट आयकॉन' म्हणून नियुक्त केले आहे.
  • २०२१ मध्ये तिला संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार मिळाला.
  • ती २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकते, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+