'सिकंदर'चे नवीन गाणे 'बम बम भोले' रिलीज, होळीपुर्वीच सलमानच्या नवीन गाण्याचा धमाका
Sikandar New Holi Song: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. लोक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 30 मार्च 2025 रोजी ईदच्या निमित्ताने थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. आज सलमान खानवर चित्रित करण्यात आलेलं होळीचं गाणं "बम बम भोले" हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. हे रिलीज होताच सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
'सिकंदर'चे नवीन गाणे 'बम बम भोले' रिलीज
दरम्यान सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'सिकंदर' चित्रपटातील दुसरे ब्लॉकबस्टर गाणे 'बम बम भोले' रिलीज झाले आहे. या होळी गाण्याचा टीझर आधी रिलीज झाला होता. आता हे गाणे रिलीज झाल्यावर सर्वजण होळीच्या आनंदात नाचताना दिसत आहेत.

हे नवीन गाणे होळी सणापूर्वीचा हिट
सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटातील या गाण्याने 14 मार्च 2025 रोजी होळीच्या सणापूर्वीच लोकांचा मूड तयार केला आहे. उडणाऱ्या रंगीबेरंगी गुलालाच्या उधळणीत सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांचा दमदार डान्स आणि अद्भुत केमिस्ट्री लोकांची मने जिंकत आहे. सिकंदरच्या या नवीन गाण्या 'बम बम भोले' मध्ये तुम्हाला नाचायला भाग पाडणारे संगीत तर आहेच, पण त्यात एक उत्तम रॅप देखील आहे. हे गाणे पाहून भाईजानचे चाहते आनंदाने नाचत आहेत.
गाण्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत की, यावेळी होळीच्या दिवशी हे गाणे वाजवून रंग आणि गुलाल उडणार आहेत. रिलीज झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच या गाण्याला यूट्यूबवर 1.24 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. फार कमी वेळेत हे गाणं हिट झाल्याने लोकांच्या म्हणण्यांनुसार हे गाणं म्हणजे होळीसाठी एक उत्कृष्ट कलाकृती आहे. गाण्यात शानच्या आवाजाची जादू आणि सलमान भाईजानचा स्वॅग पाहायला मिळतो.
'बम बम भोले' या गाण्यात काय खास आहे?
'बम बम भोले' या गाण्यात सलमान खान लाल शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये दिसत आहे. तो पूर्ण स्वॅगने नाचत आणि गात आहे -डालो नवाबी रंग डालो, डालो गुलाबी रंग डालो... डालो तूफानी रंग डालो, डालो नूरानी रंग डालो... छन छन करती छैल छबीली, दुनिया लगती रंग रंगीली रे, काली दिखती मुझको पीली, थोड़ी सी जो पीली पीली रे... हो बम बम भोले शंभू, उड़ा भेजे का तंबू, कहीं ना गिर जाऊं, संभालो मुझे बंधू।
गाण्यात दिसली काजल अग्रवालची झलक
'बम बम भाले' या गाण्यात रश्मिका मंदान्ना सलमान खानसोबत डान्स करताना दिसत आहे. गाण्यात काजल अग्रवाल आणि शर्मन जोशीची झलकही दिसते. या गाण्याला प्रीतम यांचे अद्भुत संगीत आहे जे शान, देव नेगी आणि अंतरा मित्रा यांच्या मोहक आणि उत्साही आवाजांनी सजलेले आहे.
"बम बम भोले" हे गाणे शेक्सपियर, वाय-अॅश आणि हुसेन (बॉम्बे लोकल) यांनी लिहिले आणि सादर केले आहे. ज्यामध्ये एक दमदार रॅपचा समाविष्ट करण्यात आला आहे. ज्यामुळे गाणे आणखी उत्साही बनवते. शिवाय, या रॅपमध्ये किड रॅपर्स भीमराव जोगु, सरफराज शेख आणि फैजल अन्सारी (द धारावी ड्रीम प्रोजेक्ट) देखील आहेत, जे ट्रॅकमध्ये एक रॉ, उत्साही वातावरण तयार होते.












Click it and Unblock the Notifications