Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भाईजान 'सिकंदर'चा आणखी एक धांसू लूक; पोस्टर शेअर करुन सलमान म्हणाला, मिलते है...

सलमान खानच्या चाहत्यांना सध्या त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाची उस्तुकता आहे. चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. त्याआधी गुरुवारी होळीच्या निमित्ताने निर्मात्यांनी सलमानच्या चाहत्यांना एक अनोखी भेट दिली. या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमधील सलमानचा धांसू लुक पाहून, या चित्रपटात अॅक्शन भरपूर असेल हे स्पष्ट झाले आहे.

Sikander s new poster launched

सलमानने पोस्टर केले शेअर

सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सिकंदर या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर स्वतः सलमान खान आहे. सलमान खान खूपच रागावलेल्या मूडमध्ये दिसत आहे. एका बाजूला जाळ आहे. त्याच वेळी भाल्यासारखी शस्त्रे त्यांच्यावर वार करताना दिसत आहे. सलमानने कॅप्शन लिहिले आहे, 'होळीच्या शुभेच्छा.' ईदला भेटूया.

चाहत्यांच्या कमेंट सुरु

पोस्टर प्रदर्शित होताच भाईजानच्या चाहत्यांनी कमेंट करायला सुरुवात केली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल असा दावा नेटिझन्स करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, 'ईदची आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट मेगा हिट होईल. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, 'खूप छान पोस्टर.' एका युजरने लिहिले की, 'फक्त 'सिकंदर' चित्रपटच नाही, तर भाईजानचा प्रत्येक चित्रपट वेगळ्या शैलीत चित्रित केला आहे. मी चित्रपटाची वाट पाहत आहे.

चित्रपटाची स्टारकास्ट कोणती?

सलमान खानच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगदास यांनी हाती घेतले आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहेत. या चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. याशिवाय काजल अग्रवाल, सुनील शेट्टी, सत्यराज आणि शर्मन जोशी हे कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+