Sikandar Box Office Collection: 3 सलमानच्या सिकंदर चित्रपटाने तिस-या दिवशी केली एवढी कमाई
Sikandar Box Office Collection Day 3: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सिकंदर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदानाची जोडी लोकांना आवडली आहे. सिकंदर' 30 मार्च 2025 रोजी प्रदर्शित होत आहे. 'सिकंदर' हा चित्रपट रमजानच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 30 मार्च 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. ईदच्या सुट्टीत भाईजानच्या चाहत्यांनी चित्रपटगृहात गर्दी केली होती.
चित्रपटाच्या कमाईत झाली घसरण
पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. सलमान खानची क्रेझ अजूनही त्याच्या चाहत्यांच्या मनात आहे. ईदचा उत्सव तीन दिवस चालतो. म्हणूनच मंगळवारी घसरण झाली असली तरी एआर मुरुगादोसचा चित्रपट अजूनही कमाईच्या बाबतीत चांगल्या स्थितीत आहे. सिंकदर चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन करण्यात आले होते.

दोन दिवसांत 55 कोटींची कमाई
सलमान खान, रश्मिका मंदान्ना, सत्यराज, प्रतीक बब्बर आणि शर्मन जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 26 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी भाईजानच्या चाहत्यांची चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या कमाईत पहिल्या दिवसाच्या तुलनेत 11.54 टक्क्यांनी वाढ झाली. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी एकूण 29 कोटींची कमाई केली. अशा परिस्थितीत चित्रपटाने 2 दिवसांत 55 कोटी रुपये कमावले आहेत.
'सिकंदर'चा तिसऱ्या दिवशीचा बॉक्स ऑफिस कलेक्शन
साजिद नाडियाडवाला निर्मित 'सिकंदर' चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजेच 1 एप्रिल 2025 रोजी 19.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आता चित्रपटाचे एकूण कलेक्शन 74.5 कोटी रुपये झाले आहे. चित्रपटाच्या कमाईत घट झाली असली तरी हा चित्रपट सिंगल स्क्रीनवर हाऊसफुल्ल सुरू आहे. भाईजानचे चाहते त्याच्यावर खूप प्रेम करत आहेत. सोशल मीडिया आणि समीक्षकांकडून टीका होऊनही 'सिकंदर' चित्रपटाची क्रेझ संपत नाहीये. लोकांना भाईजानचा चित्रपट पाहायला आवडत आहे.
सिकंदरचे बजेट 200 कोटी
चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. मात्र चित्रपटाचे अर्धे बजेटही वसूल झालेले नाही. हा चित्रपट 200 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीकडे पाहता बॉक्स ऑफिसवर हिट होईल अशी शक्यता आता फारचं कमी आहे. 'सिकंदर' मध्ये सलमान खानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिका साकारत आहे.












Click it and Unblock the Notifications