Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'मागे हो, औकादीद रहा..', गर्भवती कियाराला घेरताच सिद्धार्थ मल्होत्रा संतापला; व्हिडिओ व्हायरल

Sidharth Malhotra gets angry at the paparazzi : बॉलिवूड जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यास उत्सुक आहेत. दरम्यान, हे जोडपे एका क्लिनिकच्या बाहेर दिसले. दरम्यान, सिद्धार्थचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो कियाराला पापाराझी कॅमेऱ्यांपासून वाचवताना आणि पापाराझींवर रागावताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये कियारा अडवाणी ऑफ-व्हाइट पँट आणि गुलाबी रंगाचा शर्ट परिधान करताना दिसत होती. यावेळी तिने गुलाबी रंगाच्या फुलांच्या क्लचने केस घट्ट पकडले होते. तर सिद्धार्थने काळ्या पँटसह पांढरा शर्ट घातला होता. यासोबत त्याने काळी टोपीही घातली होती.

sidharth malhotra

'मागे जा, सभ्यतेत रहा'

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​पापाराझींवर चांगलाच संतापलेला दिसला. कियारा तिच्या कारमध्ये बसल्यानंतर पापाराझीं त्यांचे कॅमेरे घेऊन तिच्या गाडीजवळ पोहोचतात. अशा परिस्थितीत, सिद्धार्थ पाठिमागून येताच तो जोरात ओरडला. त्वरीत येथून मागे जा, सभ्यतेत वागा' मला रागावू नका, पूर्णपणे मागे जा', अशा शब्दात त्याने सर्व पापाराझींना सुनावले.

'आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट'

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी 28 फेब्रुवारी 2025 रोजी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची घोषणा केली होती. लोकरीच्या मोज्यांचा फोटो पोस्ट करताना या जोडप्याने कॅप्शनमध्ये लिहिले- 'आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट लवकरच येत आहे.

सिद्धार्थ मल्होत्राचा वर्कफ्रंट

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, सिद्धार्थ मल्होत्रा ​​शेवटचा 'योद्धा' चित्रपटात दिसला होता. आता हा अभिनेता 'परम सुंदरी' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर देखील मुख्य अभिनेत्री म्हणून त्याच्यासोबत असेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+