Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ! इनकम विभागाची घरावर धाड, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Shilpa Shetty Income Tax Raids Hit Home : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यासाठी डिसेंबर महिना मोठ्या संकटांचा ठरत आहे. १७ डिसेंबर रोजी बेंगळुरू आणि मुंबईतील त्यांच्या 'बास्टियन' रेस्टॉरंटवर छापे पडल्यानंतर, आता आज १८ डिसेंबर रोजी आयकर विभागाने थेट शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील निवासस्थानी धडक दिली आहे. आर्थिक अनियमितता आणि करचुकवेगिरीच्या संशयावरून ही मोठी कारवाई केली जात आहे.

Shilpa Shetty in Trouble Income Tax Raids Hit Her Home

कारवाईचे मुख्य कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाला शिल्पा शेट्टीच्या हॉटेल व्यवसायातील गुंतवणूक आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये मोठी तफावत असल्याचे संशय आहे. वांद्रे येथील घराव्यतिरिक्त बेंगळुरू येथील 'बास्टियन गार्डन सिटी'वरही छापे टाकण्यात आले आहेत. येथील आर्थिक नोंदी, व्यवहार आणि डिजिटल डेटाची तपासणी सुरू आहे. नुकतेच बेंगळुरू पोलिसांनी बास्टियन रेस्टॉरंटवर निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ (रात्री १:३० वाजेपर्यंत) सुरू राहिल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे हे प्रकरण अधिक तापले.

६० कोटींच्या फसवणुकीचे जुने प्रकरण पुन्हा चर्चेत

शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्यावर लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक दीपक कोठारी यांनी ₹६०.४८ कोटींच्या फसवणुकीचा आरोप केला आहे.

गंभीर गुन्हे दाखल: या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) फसवणुकीचे (कलम ४२०) गंभीर कलम लावले आहे.

दादर येथील बास्टियन रेस्टॉरंटवर १७ डिसेंबरला धाड पडली असतानाच, मुंबई उच्च न्यायालयाने या दाम्पत्याला परदेशात जाण्यापूर्वी ₹६० कोटी जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

धाडींचे सत्र सुरू, त्यातच नव्या रेस्टॉरंटची घोषणा

विशेष म्हणजे, एकीकडे आयकर विभागाची कारवाई सुरू असतानाच शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर आपल्या नवीन व्यवसायाची घोषणा केली आहे. वांद्रे येथे जिथे जुने बास्टियन होते, त्याच ठिकाणी शिल्पाने 'अम्माकाई' नावाचे नवीन दाक्षिणात्य (मंगळुरी) रेस्टॉरंट उघडले आहे. १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता हे रेस्टॉरंट लोकांसाठी खुले होत असल्याची पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली, ज्यामध्ये तिने "आरक्षण नाही, थेट या" असे आवाहन केले आहे.

"न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास"

या सर्व प्रकरणावर शिल्पा शेट्टीने आपली अधिकृत भूमिका मांडली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे म्हटले की, "आमच्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार आणि हेतूने प्रेरित आहेत. आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आणि देशाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माध्यमांनी संयम बाळगावा."

बास्टियनचे व्यावसायिक समीकरण काय?

बास्टियन रेस्टॉरंट हे 'बास्टियन हॉस्पिटॅलिटी'च्या मालकीचे असून त्याचे संस्थापक रणजीत बिंद्रा आहेत. यामध्ये शिल्पा शेट्टीची ५० टक्के भागीदारी आहे. या रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार होत असल्याची आणि उत्पन्नाचा खरा आकडा लपवला जात असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाल्याचे समजते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+