शिल्पा शेट्टी अन् पती राज कुंद्रांने व्यावसायिकाला 60 कोटींनी फसवलं! गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण
Shilpa Shetty and Raj Kundra : बाॅलीवूडची दिग्गज अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांच्यावर एक मोठा आरोप झाला असून एका व्यावसायिकाने या प्रसिद्ध अभिनेत्रीसह तिचे पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध ६० कोटी रुपयांचा फसवणूकीचा आरोप केला आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, व्यवसायाच्या विस्तारासाठी दोघांना ६०. ४८ कोटी रुपये दिले होते पण त्यांनी ते वैयक्तिक कारणांसाठी खर्च केल्याचे व्यावसायिक दीपक कोठारी यांनी आरोप केला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती, उद्योगपती राज कुंद्रा यांचे हे प्रकरण विश्वासघात आणि फसवणुकीचे आहे. सुरुवातीला जुहू पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु ही रक्कम 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याने याचा तपास आता स्वतंत्र सेल असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी EOW तपास करत आहे.
काय आहे प्रकरण?
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे हे प्रकरण आता बंद पडलेल्या बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडसाठी कर्ज-सह-गुंतवणूक कराराशी जोडलेले आहे.
- उद्योगपती दीपक कोठारी यांनी आरोप केला आहे की, त्यांनी २०१५-२०२३ च्या सुमारास व्यवसाय विस्तारासाठी त्यांना ६०.४८ कोटी रुपये दिले होते, परंतु त्यांनी ते वैयक्तिक खर्चावर या दाम्पत्याने खर्च केले.
- कोठारी यांनी दावा केला की ते २०१५ मध्ये एजंट राजेश आर्य यांच्यामार्फत शेट्टी-कुंद्रा यांच्याशी संपर्कात आले होते. त्यावेळी, हे जोडपे बेस्ट डील टीव्ही या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मचे संचालक होते; त्यावेळी शेट्टी यांच्याकडे कंपनीत ८७% पेक्षा जास्त शेअर्स होते.
- शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी १२ टक्के वार्षिक व्याजदराने ७५ कोटी रुपयांचे कर्ज मागितले होते, परंतु जास्त कर टाळण्यासाठी शिल्पा शेट्टीने कोठारी यांना पुर्ण विश्वास दिला की, त्यांनी ही रक्कम "गुंतवणूक" म्हणून वापरुया. यानंतर एक बैठक झाली आणि पैसे वेळेवर परत केले जातील असे आश्वासन देऊन करार अंतिम करण्यात आला होता.
- कोठारी यांनी एप्रिल २०१५ मध्ये सुमारे ३१.९५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित केला. यानंतर सप्टेंबरमध्ये दुसरा करार झाला. व्यावसायिकाने सांगितले की त्यांनी जुलै २०१५ ते मार्च २०१६ दरम्यान २८.५४ कोटी रुपये अधिक हस्तांतरित केले.
- एकूण, त्यांनी करारासाठी ६०.४८ कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली होती, तसेच ३.१९ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणून भरले होते असेही आरोपात आहे. मात्र या व्यावसायिकाला आजपर्यंत ही रक्कम परत मिळाली नाही असे वनइंडिया हिंदीच्या वृत्तात म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications