शिखर धवनने हुमा कुरेशीला केले होते 'किस'?, समोर आले सत्य आणि चाहते झाले होते थक्क!
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या चुलत भावाचा (कझिन) गंभीर वादातून खून झाल्याची बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात गुरुवारी रात्री पार्किंगवरून झालेल्या वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११ च्या सुमारास दिल्लीतील जंगपुरा भागातील भगोल बाजार लेनमध्ये ही घटना घडली.

हुमा कुरेशीच्या चुलत भावाचा खून
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीच्या पार्किंगवरून दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. याचवेळी आरोपी गटाने हुमा कुरेशीच्या चुलत भावावर, आसिफ कुरेशी याच्यावर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या आसिफला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
शिखर धवन आणि हुमा कुरेशी डेट करत होते?
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शिखर धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. काही दिवसांपूर्वी त्याचे आणि अभिनेत्री हुमा कुरेशीचे काही फोटो व्हायरल झाले होते, ज्यात शिखर तिला गालावर 'किस' करताना दिसत होता. या फोटोंमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली होती आणि शिखर-हुमा एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू झाली होती.
सत्य समोर आल्यावर चाहते झाले थक्क
मात्र, जेव्हा यामागील सत्य समोर आले, तेव्हा सर्वचजण आश्चर्यचकित झाले. हे फोटो खरे नव्हते. 'कलंबाज़ी अड्डा' नावाच्या एका फेसबुक पेजवरून हे फोटो व्हायरल झाले होते, पण नंतर असे समोर आले की हे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या मदतीने एडिट करण्यात आले होते. हे फोटो जाणीवपूर्वक कुणीतरी बनवले होते, जेणेकरून संभ्रम निर्माण होईल. त्यानंतर हे फोटो त्या पेजवरून काढून टाकण्यात आले.












Click it and Unblock the Notifications