सलमानचा बाॅडीगार्ड शेरा विमानतळावर संतापला, ओरडला, अंगावर धावला... नेमकं काय झालं? पहा व्हिडीओ...
तारे तारकांच्या बाॅडीगार्डचे अनेक किस्से यापूर्वी चर्चेत आले आहेत. अनेकदा त्यांना चाहत्यांवर भडकतानाही पाहिले गेले आहे. सलमानच्या बाँडीगार्ड शेराचा असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओत शेरा पत्रकारांवर आपला राग काढताना दिसला आहे. ही घटना मुंबई विमानतळावर रविवारी सकाळी घडली. ज्यात शेराने मोठ्या आवाजात पत्रकारांना हाकलून लावले.

नेमके काय झाले?
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान रविवारी सकाळी मुंबई विमानतळाबाहेर आला. त्यावेळी त्याच्याभोवती कडक सुरक्षा व्यवस्था होती. सलमान खान हा पत्रकारांना फोटो देण्याच्या मूडमध्ये नव्हता, असे त्याचे हावभाव सांगत होते. सलमानचा हाच मूड त्याच्या विश्वासू अंगरक्षक शेराने ओळखला. सलमानच्या अगोदर शेरा पुढे आला. तो फोटोग्राफर्सवर चांगलाच ओरडला.
शेराचा आक्रमक मूड
सलमानच्या अगोदर पत्रकारांना सामोरे गेलेला शेरा पत्रकारांवर चांगलाच भडकला. पत्रकारांपासून आपल्या मालकाचे म्हणजेच सलमान खानचे रक्षण करताना तो दिसला. सलमान बाहेर आल्याबरोबर छायाचित्रकार त्याचा फोटो घेत होते तेव्हा शेरा त्यांच्यावर ओरडताना दिसला. शेराचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.
शेरा यापूर्वीही होता चर्चेत
शेरा हा सलमानचा वैयक्तिक अंगरक्षक आहे. सलमानच्या प्रत्येक कठीण काळात तो त्याच्यासोबत राहिला आहे. जेव्हा त्याला वाटले की सलमान फोटो काढण्याच्या मूडमध्ये नाही, तेव्हा त्याने फोटोग्राफर्सला बाहेर काढले. सलमानही आक्रमकपणे काही छायाचित्रकारांना दूर ढकलून पुढे जाण्यासाठी जागा मोकळी करताना दिसला. "कोणीही नको आहे." "सर्वजण इथे या, चला!" असे म्हणत त्याने फोटोग्राफर्सला बाहेर ढकलले.
बस कर ओये
जेव्हा एका छायाचित्रकाराने व्हिडिओ रेकॉर्ड करणे सुरू ठेवले तेव्हा शेरा संतापला. "बस कर ओये!" म्हणत त्याने कॅमेरामनला झापले. शेरा ओरडत असताना सलमाननेही त्याला थांबवले नाही. गंभीर चेहऱ्याने सलमान गाडीकडे गेला. सलमान नुकताच बहुचर्चित चित्रपट 'सिकंदर' मध्ये दिसला होता. जो ईदच्या निमित्ताने प्रदर्शित झाला होता. पण हा चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला. हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर केवळ १०० कोटी रुपयांची कमाई करू शकला.












Click it and Unblock the Notifications