शेख हसीना यांनी परिधान केलेल्या साडीची किंमत लाखो रुपये! 'त्या' साडीला मिळाला GI टॅग
या वर्षाच्या सुरुवातीला बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या, ज्यामfध्ये शेख हसीना पुन्हा एकदा विजयी झाल्या आणि पाचव्यांदा पंतप्रधान झाल्या. पण बांगलादेशातील आरक्षणविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवार दि. 5 ऑगस्ट रोजी राजीनामा दिला आहे.
शेख हसीना या जगातील एकमेव महिला पंतप्रधान होत्या, ज्या साडी आणि डोक्यावर पदर घेऊन त्यांनी आपल्या साडी पेहरावातुन देशातील कला आणि संस्कृतीचा प्रचारही केला होता.

भारत आणि बांगलादेश यांच्यात साडी डिप्लोमसीची नेहमीच चर्चा होत असते. खरे तर हसीना शेख जेव्हा-जेव्हा भारतात यायच्या तेव्हा त्यांनी भेट म्हणून जमदानी साडी आणली आहे. कारण बांगलादेशच्या माजी पंतप्रधान हसीना शेख यांना जामदानी साड्या खूप आवडतात.त्या प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या खास साडीत दिसून आल्या होत्या.
जामदानी साडी म्हणजे काय?
जामदानी साडी विणण्याची बंगाली वंशाची परंपरा आहे आणि त्याचे केंद्र बांगलादेशचे नारायणगंज हे आहे. कापूस आणि सोन्याचे धागे मिसळून तो बराच काळ विणला जात होता. आताही ही साडी बनवताना सोन्याचा वापर केला जातो परंतु त्याचे प्रमाण आता कमी आहे.जामदानीला ढाकाई असेही म्हणतात, ज्याचे नाव बांगलादेशची राजधानी ढाका आहे.
जामदानी साडीला मिळाला जीआय टॅग
या साड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या मशीनने बनवल्या जात नसून जामदानीचे विणकाम अत्यंत कुशल कारागिरांकडून केले जाते. ते विणण्यापूर्वी ते काय बनवतील याचा त्यांच्या मनात एक संपूर्ण नमुना असतो. आधी जिथे जामदानीवर फक्त फुलं कोरली जायची, आता त्यात भौमितिक पॅटर्न किंवा लँडस्केप पॅटर्नही दिसतात.एक साडी बनवायला साधारण 20 दिवस लागतात. काही वर्षांपूर्वी युनेस्कोने या विणकाम पद्धतीला सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले. 2016 मध्ये जामदानी साडीला GI टॅग मिळाला होता.
हसीना यांनी भारतातील 'या' महिलांना दिली जामदानी साडी
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान हसीना शेख या जामदानी साडीला प्रोत्साहन देतात आणि त्या जगामध्ये कुठेही जातात तेव्हा त्या जामदानी साड्या घेऊन जातात आणि भेट म्हणून देतात.त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईला ती खास जामदानी साडी भेट म्हणून दिली होती. याशिवाय हसीना शेख यांनी ही साडी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही भेट दिली आहे.
सोशल मीडियावर गदारोळ
फेब्रुवारी मध्ये पश्चिम बंगालला टांगेलच्या साड्यांना जीआय टॅग मिळाला होता. यानंतर बांगलादेश संतप्त झाला. खरेतर, पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी पूर्व वर्धमान आणि नादिया जिल्ह्यात विणलेल्या या साडीवर आपला हक्क आहे. भारताला GI टॅग मिळाल्यानंतर त्याबाबत सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला होता.
शेख हसीना सहसा जामदानी साडी नेसतात, पण या वर्षी फेब्रुवारीमध्ये जर्मनीतील एका कॉन्फरन्समध्ये त्यांनी तंगेल प्रकारातील साडी नेसली होती, जेणेकरून या साडीवर बांगला देशाचाही अधिकार असल्याचे त्या हावभावातून स्पष्ट झाले होते.
अशी बनवतात जामदानी साडी
जामदानी साडी ही कापूस आणि सोन्याचे धागे मिसळून बनवली जाते. त्यामुळे त्या साडीची किंमत 2 हजार रुपयांपासून सुरु होते. सोन्याचे काम करून बनवलेल्या या साड्यांची किंमत लाखो रुपये असते.












Click it and Unblock the Notifications