Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अचानक जाणं, अभिनेत्री शेफाली जरीवालाचा मृत्यू; 15 वर्षे एका गंभीर आजाराशी लढा

'कांटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. तिच्या आकस्मिक निधनाने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली असून चाहत्यांसह सेलिब्रिटींनाही ही बातमी पचवणं कठीण जात आहे.

shefali jariwala death

या पार्श्वभूमीवर शेफालीचा एक जुना इंटरव्ह्यू सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तिने आपल्या आरोग्याशी संबंधित लढ्याबद्दल उघडपणे बोललं होतं.

15 व्या वर्षी सुरू झाला आजार

एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, ती वयाच्या 15 व्या वर्षापासून 'एपिलेप्सी' (आकडी) या आजाराशी झुंज देत होती. "त्या काळात अभ्यासातील स्पर्धा, गुणांच्या अपेक्षा आणि मानसिक तणावामुळे माझ्या तब्येतीवर परिणाम झाला," असं तिने स्पष्ट केलं होतं.

ती पुढे म्हणाली होती, "माझे झटके कुठेही येत - वर्गात, स्टेज मागे, अगदी सार्वजनिक ठिकाणी देखील. यामुळे आत्मविश्वास खूप ढासळला."

करिअरला टाच बसली, लोक विचारायचे - 'काम का करत नाहीस?'

"'कांटा लगा' नंतर अनेकांनी विचारलं की मी अधिक काम का करत नाही. पण मला माहीत नसायचं की, पुढचा अटॅक कधी आणि कुठे होईल. त्यामुळे काम करणे खूप कठीण झालं होतं," असं शेफालीने त्या मुलाखतीत नमूद केलं होतं.

आरोग्यात सुधारणा, 9 वर्षांपासून मुक्त

तिच्या त्या मुलाखतीत तिने अभिमानाने सांगितलं होतं की, गेल्या 9 वर्षांपासून तिला कोणताही अटॅक आलेला नाही. "हे शक्य झालं, कारण मला माझ्या जवळच्या लोकांकडून भरपूर भावनिक पाठिंबा मिळाला. मी नैसर्गिक पद्धतीने माझं मानसिक आरोग्य सावरण्याचा प्रयत्न केला," असंही ती म्हणाली होती.

मृत्यूचं कारण काय?

शुक्रवारी शेफालीच्या निधनाची बातमी आली. कार्डियक अरेस्ट (हृदयविकाराचा झटका) हे संभाव्य कारण असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तिचे पती पराग त्यागी व इतर नातेवाईकांनी तिला बेलेव्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, जिथे तिला मृत घोषित करण्यात आलं.

सध्या तिचा मृतदेह कूपर रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी नेण्यात आला असून, कुटुंबीयांनी अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन दिलेलं नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+