Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एका गाण्याने बदलले शेफाली जरीवालाचे आयुष्य! 'कांटा लगा' या गाण्यासाठी किती मिळाले होते पैसे? वाचा

Shefali Jariwala Death : काँटा लगा या एका गाण्याने रातोरात स्टार झालेली आणि बिग बाॅस फेम शेफाली जरीवाला हिचा 27 जून रोदी रात्री हृदयगती थांबल्याने निधन झाले. कांटा लगा फेम शेफाली जरीवालाचे निधन हा मनोरंजन जगताला बसलेला अचानक धक्का आहे, कारण तिनेही अवघ्या 42 व्या वर्षी अचानक एक्झिट घेतली असून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्या आले आहेत.

Shefali Jariwala Death

मुंबईत जन्मलेली शेफाली खरंतर अभियंता आयटीमध्ये शिक्षण घेत असतानाच तिला कांटा लगा या गाण्याची ऑफर आली आणि तिने ती स्वीकारली. ही ऑफर तिच्या बाॅलीवूड जगतात प्रवेशाचे महाद्वारच ठरली. यानंतर शेफालीने कधीच मागे वळून पाहीले नाही.

शेफालीने पहिल्या पतीशी घटस्फोट घेतल्यानंतर टीव्ही कलाकार पराग त्यागीशी लग्न केले. ही जोडी नच बलिए स्पर्धेत सुपरहीट ठरली. दोघांनी दोनवेळा डान्स शो मध्ये सहभाग घेतला होता. यानंतर तिने बुगी-वुगी, बिग बाॅस सीजन -13 मध्येही सहभाग घेतला होता.

Shefali Jariwala Death

'कांटा लगा' गाणे अन् वडिलांचा विरोध

शेफाली जरीवाला हिच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर तिची एक जुनी मुलाखत समोर आली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या सर्वात लोकप्रिय 'कांटा लगा' गाण्याशी संबंधित भाष्य केले आहे. त्या काळाबद्दल बोलताना शेफालीने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले होते की, "मी कॉलेजमध्ये होते आणि मला कांटा लगा या गाण्याची ऑफर आली, तेव्हा माझे कुटुंब अभ्यासाला पूर्ण प्राधान्य देत होते. माझ्या आई-वडिलांना मी फक्त अभ्यास करावा असे वाटत होते. पण मला हे गाणे करावे लागले कारण मला त्यासाठी पैसे मिळत होते. शेफालीने सांगितले की, 'माझे वडील पूर्णपणे विरोधात होते. म्हणून मी प्रथम माझ्या आईला विश्वासात घेतले आणि नंतर आम्ही दोघांनी मिळून वडिलांना पटवून दिले."

Shefali Jariwala Death

शेफालीला किती मिळाले होते कांटा लगा या गाण्यासाठी पैसे?

एक सत्य शेअर केले आहे. शेफाली जरीवालाने मुलाखतीत सांगितले होते की तिला या सुपरहिट गाण्यासाठी फक्त 7 हजार रुपये मिळाले होते. त्यावेळी ती अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. संगीत व्हिडिओ दिग्दर्शित करणारे राधिका राव आणि विनय सप्रू यांनी तिला कॉलेजच्या बाहेर पाहिले होते. या दोघांनीही तिला एक संगीत व्हिडिओ ऑफर केला होता. "मला स्वतःला टीव्हीवर पहायचे होते, म्हणून या गाण्याची ऑफर स्वीकारली." असेही ती मुलाखतीत म्हणाली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+