'मी व्हॅनमध्ये कपडे बदलत होते आणि तो...', एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दिग्दर्शकाबद्दल धक्कादायक खुलासा
Shalini Pandey: दक्षिण चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंत आपला अभिनयासाठी खास ओळखली जाणारी अभिनेत्री शालिनी पांडे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या एका विधानामुळे ही अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिने दक्षिणेत झालेल्या कास्टिंग काउचबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे.
खरं तर शालिनी पांडेने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना दक्षिण इंडस्ट्रीतील एका दिग्दर्शकाबद्दल एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे. अभिनेत्री म्हणाली की, एके दिवशी जेव्हा ती व्हॅनिटी व्हॅनमध्ये कपडे बदलत होती, तेव्हा प्रसिद्ध दिग्दर्शक न विचारता आत आला.

शालिनी पांडेचा धक्कादायक खुलासा
शालिनी पांडेने फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत तिच्या अभिनय कारकिर्दीतील संघर्षमय दिवसांबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, मी नेहमीच चांगल्या पुरुषांसोबत काम केलेले नाही. मी ऑन स्क्रीन, ऑफ स्क्रिन आणि क्रूमध्ये काही खतरनाक पुरुषांसोबत काम केले आहे. शालिनी पांडे पुढे म्हणाली, आपल्या फक्त आपल्या मर्यादा ठरवायच्या असतात. माझ्या कारकिर्दीत मला अत्यंत धोकादायक पुरुषांनाचा सामना करावा लागला आहे. आणि हे अगदी खरे आहे.
'मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये कपडे बदलत असताना अचानक एक दिग्दर्शक व्हॅनचा दरवाजा न खटखटता आतमध्ये घुसला'. शालिनी पांडे पुढे म्हणाली की, मला कोणतेही फिल्मी पार्श्वभूमीची नाही, म्हणून सुरुवातीला मला गोष्टी कशा हाताळायच्या हे माहित नव्हते.
माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मी एका साऊथ चित्रपटात काम करत होते. मग एके दिवशी सेटवर चित्रपटाचा दिग्दर्शक दरवाजा ठोठावल्याशिवाय माझ्या व्हॅनमध्ये घुसला. त्यावेळी मी व्हॅनमध्ये कपडे बदलत होते. त्यांना पाहून मी पूर्णपणे घाबरले, पण नंतर मी दिग्दर्शकावर ओरडलो. असं कधी घडेल, असं मला कधी वाटले नव्हते. त्यावेळी मी खूप घाबरलो होते,असं तिने म्हटलं आहे.
शालिनी पांडे पुढे बोलताना म्हणाली की, त्यावेळी मी फक्त 22 वर्षांची होते. लोकांनी मला सांगितले की, मी त्यांच्यावर ओरडायला नको होते. मात्र मुलींच्या व्हॅनमध्ये अशाप्रकारे जाणे ही कुठली पध्दत आहे. जर मी नवीन आहे तर तुम्ही दरवाजा ठोठावल्याशिवाय आत येऊ शकत नाही. आत येण्यापूर्वी तुम्ही विचारायला हवे होते, असं तिने दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications