Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Video : शक्ती कपूरचा ३५ वर्षांपूर्वीचा 'हा' व्हिडीओ पहा; तुम्हीही म्हणाल 'बाॅलिवूडचे बाबा वांगा'

सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोने एक लाख रुपयांवर पोहोचले आहे. मात्र ३५ वर्षांपूर्वी कुणी सोने एक लाखांच्या पुढे जाईल असे सांगितले असते तर..? खरे वाटले नसते ना..? पण हिंदी चित्रपटातील आघाडीचा खलनायक शक्ती कपूर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत १ लाखांच्यापुढे जाताच शक्ती कपूरचा ३५ वर्षे जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक शक्ती कपूरला 'बॉलिवूडचे बाबा वांगा' म्हणत आहेत तर काही लोक त्यांना पैगंबर म्हणत आहेत.

Shakti Kapoor s video goes viral

सोने लाखाच्या घरात

मंगळवारी म्हणजेच २२ एप्रिलला सोन्याच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर त्याने पहिल्यांदाच प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. सोन्याने लाखाचा टप्पा पार केल्यावर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. १९८९ मध्ये आलेल्या 'गुरु' चित्रपटातील एका दृष्याचा तो व्हिडीओ होता. खलनायक शक्ती कपूरची ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. यामध्ये शक्ती कपूरचे सोन्याच्या किमतीबद्दल असा दावा करते की सोन्याची किंमत प्रति तोळा ५ हजार रुपयांवरून १ लाख रुपये प्रति तोळा होईल.

काय आहे या व्हिडीओत?

या व्हिडिओमध्ये खलनायक शक्ती कपूरचे पात्र जो डायलाँग म्हणत आहे, ते दाखवले आहे. शक्ती कपूर म्हणत आहे, जेव्हा या सोन्याची किंमत वाढेल तेव्हा आपण मालामाल होऊ. सोन्याची किंमत पाच हजार, दहा हजार, पन्नास हजार, सोन्याची किंमत एक लाख रुपये तोळा होईल... असं शक्ती कपूर म्हणत आहे.

व्हिडीओ होतोय व्हायरल

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्हिडीओखाली यूजर्सनी कमेंट्सचा पाऊस पाडला. काही वापरकर्त्यांनी शक्ती कपूर यांना सलाम केला. त्यांना सर्वोत्तम विश्लेषक म्हटले. एकाने लिहिले, 'शक्ती कपूर हा शेअर बाजारातील सर्वोत्तम विश्लेषक आहे. सोने १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज काही दशकांपूर्वी वर्तवण्यात आला होता. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, 'खरा विश्लेषक शक्ती कपूर आहे. मी त्याला सलाम करतो. दुसरी टिप्पणी अशी आहे, 'जगातील सर्वोत्तम संशोधन विश्लेषक आणि बॉलिवूडचे बाबा वांगा शक्ती कपूर.'

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+