Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शाहरुख खानसोबत मोठा अपघात; उपचारासाठी अमेरिकेत रवाना, नेमकं काय झालंय किंग खानला?

Shah Rukh Khan latest Marathi News : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानबद्दल एक मोठी बातमी समोर येत आली आहे. शाहरुख खान त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली. शूटिंग दरम्यान त्याला खूप दुखापत झाली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्याला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नेमकं काय घडलं, जाणून घ्या!

ही बातमी समोर येताच शाहरुख खानचे चाहते खूप चिंतेत दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये 'किंग' चित्रपटाचे शूटिंग करत होता. शूटिंग दरम्यान एका हाय-इंटेंस अॅक्शन सीनमध्ये काम करताना त्याला स्नायूंना दुखापत झाली आहे.

सध्या, डॉक्टरांनी शाहरुख खानला त्याच्या दुखापतीमुळे पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की शाहरुख खान त्याच्या आरोग्याबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही, म्हणून तो उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाला आहे.

Shahrukh Khan

'किंग' चित्रपटाचे चित्रीकरण तात्पुरते थांबले!

डॉक्टरांच्या मते, दुखापत खूप मोठी आहे, त्यामुळे शाहरुख खान पूर्णपणे बरा होण्यासाठी त्याला किमान एक महिना बेड रेस्ट घ्यावी लागेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानच्या प्रकृतीमुळे 'किंग' चित्रपटाचे चित्रीकरण तात्पुरते थांबवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे चित्रीकरण जुलै आणि ऑगस्ट महिन्यात फिल्म सिटी, यशराज स्टुडिओ आणि गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये होणार होते, जे आता पुढे ढकलण्यात आले आहे.

असे म्हटले जात आहे की आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये पुन्हा शूटिंग सुरू होईल, जेव्हा किंग खान पूर्णपणे निरोगी होईल. तथापि, या प्रकरणात शाहरुख खान किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान देण्यात आलेले नाही.

सुपरस्टारसाठी चाहत्याकडून प्रार्थना

'किंग' चित्रपटाबद्दल आधीच प्रचंड चर्चा आहे कारण पहिल्यांदाच शाहरुख खान त्याची मुलगी सुहाना खान सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत, ज्यांनी यापूर्वी किंग खानचा सुपरहिट चित्रपट पठाण बनवला होता.

चित्रपटातील उर्वरित कलाकारांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, परंतु असे म्हटले जात आहे की दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, अनिल कपूर, जयदीप अहलावत, अर्शद वारसी आणि जॅकी श्रॉफ यासारख्या मोठ्या नावांना 'किंग' चित्रपटात समाविष्ट केले जाऊ शकते.

सध्या चाहते किंग खानच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत जेणेकरून तो त्याच्या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करू शकेल आणि पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाका करू शकेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+