शाहरुख खानच्या फॅन्ससाठी खूशखबर! आता घरबसल्या टीव्ही स्क्रीनवर मोफत पाहू शकाल 'डंकी'!
बाॅलीवूडचा स्टार शाहरुख खान त्याच्या अदाकारीसाठी खास प्रसिद्ध अगदी सिनेरसिकांच्या गळ्यातील तो ताईतच. त्याच्या नवीन सिनेमाची अनेकांना प्रतिक्षा असते. आता शाहरुख खानच्या फॅन्ससाठी खूशखबर समोर आली आहे. घरबसल्या टीव्ही स्क्रीनवर मोफत 'डंकी'हा मुव्ही रसिकांना पाहता येणार आहे.
शाहरुख खान बॉक्स ऑफिसवर राज्य करणारा कलाकार. त्याचे बहुतांश सर्वच चित्रपट सुपर हिट होतात. वर्ष 2023 मध्ये त्याने बाॅक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवले. त्यांच्या पठाण, जवान आणि डंकी यांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. इथलाही चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला.

झी सिनेमावर 13 ऑक्टोबरला खास संधी..
ज्यांनी डंकी हा चित्रपट अजून पाहिला नाही. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. शाहरुख खानच्या डंकीचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. हा चित्रपट झी सिनेमावर 13 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता दाखवण्यात येणार आहे. ज्यांनी अद्याप चित्रपट पाहिला नाही ते आता घरी बसून याचा आनंद घेऊ शकतात.
काय आहे चित्रपटाची कथा
कॉमेडीसोबतच डंकीच्या माध्यमातून परदेशात जाणाऱ्या लोकांच्या वेदनादायक कथाही या चित्रपटात मांडण्यात आल्या आहेत. या दिवशी शाहरुखच्या फॅन पेजवर वर्ल्ड प्रीमियर होईल, "डिंकी" चा ट्रेलर शेअर करताना लिहिले, शाहरुख खानचा भावनिक प्रवास 'डिंकी' आता तुमच्या पडद्यावर येत आहे. रविवार, 13 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता झी सिनेमावर ट्यून इन करा आणि हा चित्रपट पाहायला विसरु नका.
डंकी ही प्रेम आणि मानवतेची कथा आहे. हे अशा लोकांचे अनुभव दर्शविते जे डंकी मार्गाने देशाच्या सीमा ओलांडतात. या चित्रपटात बोमन इराणी, तापसी पन्नू, विक्की कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर या कलाकारांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची निर्मिती JIO स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स यांनी केली असून अभिजात जोशी, राजकुमार हिरानी आणि कनिका धिल्लन यांनी त्याचे लेखन केले आहे. "डिंकी" 21 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.












Click it and Unblock the Notifications