शाहरुख खानचे बारावीचे मार्कशिट झाले व्हायरल; कोणत्या विषयात होते कमी मार्क्स? कशात होता टाॅप? पहा...

चित्रपटातील तारे-तारका आणि क्रिकेटमधील रथी-महारथी यांच्या शिक्षणाची अनेकदा चर्चा होते. जसे अनेक क्रिकेटपटू कमी शिकलेले आहेत तसेच बाॅलिवूड स्टार्सही कमी शिकलेले आहेत. काहींना तर अभिनयाच्या वेडाने एवढे झपाटले होते की, त्यांना आपले शिक्षणही अर्धवट सोडावे लागले. अनेकांनी तर शाळेनंतर कॉलेजमध्येही प्रवेश घेतला नाही. बॉलिवूडमध्ये असे मोजकेच कलाकार आहेत, ज्यांनी बॅचलर आणि मास्टर्स डिग्री पूर्ण केली. यापैकी एक नाव म्हणजे शाहरुख खान. शहारुख खान हा बॉलिवूडमधील सर्वात शिक्षित अभिनेत्यांपैकी एक आहे. याच शाहरुख खानचे बारावीचे मार्क्स सध्या व्हायरल झाले आहेत.

Shahrukh Khan s 12th mark sheet

शाहरुखचे बारावीचे गुण व्हायरल

शाहरुखने दिल्लीतील हंसराज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्यावेळी त्याने एक प्रवेश फॉर्म भरला होता. त्या अर्जात त्याने त्याला बारावीला मिळालेले मार्क्सही लिहिले होते. शाहरुख खानचा हा प्रवेश अर्ज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो दिल्ली युनिव्हर्सिटी टाईम्स वेबसाइटद्वारे एका स्टुडंट्स पोर्टलने शेअर केला आहे. फॉर्मच्या या व्हायरल चित्रात शाहरुख खानचा पासपोर्ट आकाराचा फोटो दिसत आहे.

इंग्रजीत सर्वात कमी गुण

शाहरुखने दिल्लीतील हंसराज कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया येथून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. यानंतर शाहरुख खानने अनेक टीव्ही मालिका केल्या. नंतर तो मुंबईत आला. आता शाहरुखचा जो अर्ज व्हायरल झाला आहे त्यात त्याला इंग्रजी विषयात सर्वात कमी म्हणजे फक्त ५१ मार्क्स मिळालेले आहेत. शाहरुख खानला इतर सर्व विषयांमध्ये त्यापेक्षा चांगले मार्क्स मिळाले आहेत.

फोटोवर कमेंट्सचा पाऊस

शाहरुख खानच्या या व्हायरल मार्कलिस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की 'गणितात ७५ गुण, अद्भुत'. दुसरा वापरकर्ता लिहितो, 'शाहरुखचे गुण माझ्या वडिलांच्या गुणांपेक्षा कमी आहेत. पण दोघेही यशस्वी झाले आहेत. शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो २०२३ मध्ये 'पठाण', 'जवान' या चित्रपटात दिसला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+