ऑपरेशन सिंदूरवर टीका करणारी पाकिस्तानी नटी हानियाला सरदारजी - 3 मधून काढले नाही! दिलजीत दोसांझ ट्रोल
Sardaar ji 3 trailer release : दलजित दोसांझ यांचा पंजाबी काॅमेडी चित्रपट सरदारजी ३ चा ट्रेलर २२ जून २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत येत आहे पण त्यापेक्षा जास्त दलजीत दौसांझ आणि चित्रपटातील अभिनेत्री हानिया आमिर हेच जास्त चर्चेत आले आहेत. एवढेच नाही तर दलजित दोसांझ यांना ट्रोल केले जात आहे. याला मुख्य कारण हानिया आमिर असून ही तिच पाकिस्तानी अभिनेत्री आहे जिने भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर वादग्रस्त आणि भारतविरोधी विधान केले होते.
याच कारणामुळे आता हानिया पुन्हा चर्चेत आली असून चित्रपटातून तिला काढून न टाकणाऱ्या दलजित दोसांझ यांच्यावर टीका होऊ लागली आहे. रविवारी संध्याकाळी दिलजीतच्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ज्यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर देखील दिसत आहे ही बाब दिसल्यानंतर आता जास्त टीका होत आहे.

हानिया चित्रपटात राहणार..!
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हानियाला चित्रपटातून काढून टाकण्याबाबतच्या मागणी सुरु झाली. तिला सरदारजी ३ मधून काढून टाकले जाईल अशी चर्चाही होती पण आता ती सरदारजी ३ ट्रेलरमध्ये दिसली आहे. त्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
युजर्स, सिने रसिकांचा संताप
सरदारजी ३ चित्रपटात हानिया आमिरला पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील युजर्स आणि सिने रसिक संतापले आहेत आणि या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत. याला एकमेव कारण म्हणजे पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर आहे जिने पहलगाम हल्ल्यानंतर संवेदना व्यक्त करणे सोडून ऑपरेशन सिंदूरवर टीप्पणी केली होती.
कधी होणार चित्रपट प्रदर्शित
दिलजीत दोसांझ यांनी रविवारी संध्याकाळी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'सरदार जी ३' चा ट्रेलर शेअर केला. यासोबतच त्याने लिहिले की, 'सरदारजी ३' २७ जून रोजी फक्त परदेशात प्रदर्शित होईल. यावरून असे समजते की हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही.
व्हिडिओ ब्लॉक केला
भारतीय प्रेक्षकांना लगेच लक्षात आले की ट्रेलर भारतात जिओ-ब्लॉक करण्यात आला आहे. जेव्हा व्हिडिओ यूट्यूबवर प्ले केला जातो तेव्हा स्क्रीनवर एक संदेश येतो, "अपलोड करणाऱ्याने हा व्हिडिओ तुमच्या देशात उपलब्ध करून दिला नाही." असे लिहिलेले दिसले.
११ जून रोजी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ला 'सरदार जी ३' चे प्रमाणपत्र थांबवण्याची विनंती केली होती. कारण त्यात काही पाकिस्तानी कलाकारांचाही समावेश आहे. हानिया आमिर व्यतिरिक्त, नासिर चिन्योती, दानियल खावर आणि सलीम अलबेला हे देखील चित्रपटात आहेत. दिलजीतवर लोकांचा रोष उफाळून आला.
सोशल मीडियावर दिलजीतच्या 'सरदार जी ३' चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, "दिलजीतने पहलगामवर एकही ट्विट केले नाही, कारण तो त्याचा चित्रपट वाचवू इच्छित होता. या चित्रपटावर बंदी घाला." दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, "कंगना राणौत बरोबर होती." दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, "दिलजीत देशद्रोही आहे. दिलजीत पाकिस्तान समर्थक आहे. या चित्रपटाचे समर्थन करू नये."
कोण आहे हानिया आमिर?
हानिया आमिर ही एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. तिचा जन्म १२ फेब्रुवारी १९९७ रोजी झाला. उर्दू टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये ती काम करते. तिने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'जान' (२०१६) या विनोदी चित्रपटातून केली आणि त्यानंतर 'तितली' (२०१७) या चित्रपटातून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. नंतर ती 'अना' (२०१९) या रोमँटिक नाटकात दिसली.
काय होते सिंदूर ऑपरेशनवर हानियाचे वक्तव्य
भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर हानिया आमिरने "कायरतापूर्ण" असे म्हटले होते. तिने म्हटले की, तुम्ही निष्पाप लोकांवर बॉम्बफेक करू शकत नाही आणि याला रणनीती म्हणू शकत नाही, अशी हानिया आमिरने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही प्रतिक्रिया दिली होती.
"माझ्याकडे सध्या चांगले शब्द नाहीत. माझ्याकडे फक्त राग, वेदना आणि जड हृदय आहे. एक मूल गेले, कुटुंब तुटले, हे सर्व कशासाठी?" असे ती म्हणाली होती तसेच ती पुढे म्हणाली, "तुम्ही कोणाचेही संरक्षण करत नाही. ही सरळ सरळ क्रूरता आहे. तुम्ही निष्पाप लोकांवर बॉम्बफेक करून त्याला रणनीती म्हणू शकत नाही". हेही ती म्हणाली होती.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications