संजय दत्तने चौथ्यांदा केले लग्न; बाँलिवूडच्या 'खलनायक'च्या व्हायरल व्हिडिओने चर्चा वाढली...
बाँलिवूडचा खलनायक संजय दत्त वयाच्या 65 व्या वर्षी पुन्हा बोहल्यावर चढल्याची चर्चा आज देशभरात रंगली. त्याचं कारणही तसंच होतं. संजय दत्त आपल्या पत्नीसोबत सप्तपदी घेतानाचा व्हिडीओ, सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर चर्चा वाढली. खरंच संजय दत्तने पुन्हा लग्न केलं का..? हा प्रश्न सोशल मीडियावर अनेकांनी विचारला. संजय दत्तचे तीन विवाह झाले आहेत. संजय दत्तच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा झाली आहे.आता त्याने चौथ्यांदा लग्न केले का, हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला. पण व्हिडीओत दिसणारी नवरी ही त्याची तिसरी बायको मान्यताच असल्याने हे नेमकं काय चाललंय, याचा शोध अनेकांनी घेतला.
काय होत व्हायरल व्हिडीओत
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये संजय दत्त भगव्या रंगाचा धोती-कुर्ता घातलेला दिसला. तर त्याची बायको मान्यता दत्त ही साध्या ऑफ व्हाइट सूटमध्ये दिसली. या व्हिडीओशिवाय, मान्यताने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती आणि संजय हवन कुंडासमोर बसलेले दिसत आहेत. यावेळी संजय दत्तने पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केलेला दिसला. तर प्रिंटेड सूट घातलेली मान्यता हात जोडून प्रार्थना करताना दिसली. या फोटोबरोबर मान्यताने कॅप्शनमध्ये लिहिले, 'जय माता दी'. हे फोटो पाहून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले असले तरी, स्वतः संजय दत्त किंवा मान्यता यांनी त्यांच्या पुनर्विवाहाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

संजय दत्तने केले तीन विवाह
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या ६५ वर्षांचा आहे. चार दशकांच्या आपल्या कारकिर्दीत संजय दत्तने १३५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. संजय दत्तने आत्तापर्यंत तीन लग्न केले. त्याने १९८७ मध्ये रिचा शर्माशी पहिले लग्न केले होते. मात्र हा विवाह फार काळ टिकला नाही. १९९६ मध्ये ब्रेन ट्युमरमुळे ऋचाचा मृत्यू झाला. यानंतर त्यांनी अभिनेत्री रिया पिल्लईशी लग्न केले. पण हे लग्नही फार काळ टिकले नाही. यानंतर संजय दत्तने मान्यताबरोबर तिसरे लग्न केले. या लग्नापासून या दोघांना दोन मुलेही झाली आहेत.
हा व्हिडीओ नेमका कशाचा
संजय दत्त व मान्यताचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा विवाहाचा नसून तो त्यांच्या घरातील एका धार्मिक पूजेचा होता, असं त्यानंतर स्पष्ट झालं. त्यांच्या घरीच असलेल्या धार्मिक कार्यक्रमाचा हा व्हिडीओ असल्याचे नंतर सांगितले गेले. या व्हिडीओत पंडीतजींच्या मंत्रोपचाराचा आवाजही स्पष्ट येत होता. परंतु तो व्हिडीओ लग्नाचा नव्हता, असेही काहींचे म्हणणे आहे.












Click it and Unblock the Notifications