Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

समंथा रुथ प्रभूवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडील जोसेफ प्रभू यांचे निधन!

Samantha Ruth Prabhu Father Died: साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे तिचा माजी पती नागा चैतन्य दुसरं लग्न करत आहे, तर दुसरीकडे अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समंथाच्या वडीलांचं निधन झाल्याचे वृत्त आहे.

सामंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन झाले आहे. स्वत: मुलगी समंथा हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून वडिलांच्या मृत्यूची माहिती लोकांना दिली आहे. समांथाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली असून तिच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल माहिती दिली आहे.

samantha ruth prabhu

इंस्टा स्टोरीवर सामंथाची भावनिक पोस्ट

समंथा रुथ प्रभूने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे - बाय डॅड... जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाहीत तोपर्यंत. यासोबतच समांथाने हार्टब्रोक इमोजीही शेअर केला आहे. समांथाच्या या पोस्टवर लोक जोरदार कमेंट करत आहेत आणि तिच्या वडिलांना श्रद्धांजलीही वाहत आहेत. मात्र, वडिलांचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही.

सामंथाच्या कुटुंबात कोण-कोण सदस्य आहेत?

सामंथा रुथ प्रभू यांचा जन्म एप्रिल 1987 मध्ये जोसेफ प्रभू आणि निनेट प्रभू यांच्या घरी झाला. त्याचे वडील तेलुगू अँग्लो-इंडियन होते आणि आई सीरियन मल्याळी आहे. सामंथाचे दोन मोठे भाऊ, जोनाथन आणि डेव्हिड आहेत. समंथा रुथ प्रभूने अलीकडेच तिच्या वडिलांसोबतच्या ताणलेल्या नात्याबद्दल उघडपणे बोलले होते. समंथाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्या वडिलांना तिचे अभिनय क्षेत्र निवडणे अजिबात आवडले नव्हते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+