Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नागा चैतन्य तर मूव्ह ऑन झाला, आता समंथाही आयुष्याची नवी सुरुवात करणार? 'या' दिग्दर्शकाला करतेय डेट!

साऊथ सुपरस्टार समंथा रूथ प्रभू (South Superstar Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नागा चैतन्यशी घटस्फोट (Naga Chaitanya-Samantha Ruth Prabhu Divorce) झाल्यानंतर समंथाने 200 कोटी रुपयांची पोटगी घेतल्याचं म्हटलं जात होतं. मात्र काही दिवसांपूर्वी नागा चैतन्यने स्वतः या अफवांवर प्रतिक्रिया दिली आणि अशा कुठल्याही गोष्टी घडल्याचं फेटाळलं.

samantha dating news

नागा चैतन्य आणि समंथाच्या घटस्फोटाची चर्चा खूप गाजली. कुणी समंथावर टीका केली, तर कुणी तिचा बचाव केला. मात्र समंथाने यावर कधीच थेट बोलणं टाळलं. आता पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा रंगू लागली आहे.

मिडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा आणि दिग्दर्शक राज निदिमोरु (Raj Nidimoru) एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातंय. दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. मात्र त्यांच्या डेटिंगबाबत अधिकृतपणे कुणीच बोललेलं नाही.

समंथा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते आणि तिने शेअर केलेल्या अनेक फोटोंमध्ये ती राज निदिमोरूसोबत दिसते. त्यांच्या नात्याची जवळीक वाढत असल्याचं बोललं जात आहे. काही रिपोर्ट्सनुसार, हे दोघं या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या नात्याला अधिकृत नाव देण्याचा विचार करत आहेत.

समंथा पुन्हा लग्न करणार का?

डेक्कन क्रॉनिकलच्या अहवालानुसार, जसे दिवस पुढे सरले, तसं राज आणि समंथामधील नातं अधिक घट्ट झालं आहे. वर्ष संपायच्या आधी हे दोघं त्यांच्या नात्याबाबत जाहीर घोषणा करू शकतात. त्यांच्या चाहत्यांना आशा आहे की समंथा तिच्या आयुष्यात पुढे जाईल आणि पुन्हा एकदा लग्न करेल.

तरीही, सध्या त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, दोघांचं नातं चर्चेचा विषय बनलेलं आहे.

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहेत का समंथा-राज निदिमोरु?

राज आणि समंथा लिव्ह-इनमध्ये राहत असल्याच्या चर्चाही सध्या सोशल मीडियावर जोरात आहेत. पण, त्यांच्या संबंधित टीमकडून या बातम्या फेटाळण्यात आल्या आहेत. तसेच, हे वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

राज आणि समंथाचे मागील वैयक्तिक संबंध

राज निदिमोरुने 2015 मध्ये श्यामली डेशी हिच्याशी लग्न केलं होतं. मात्र 2022 मध्ये हे दोघं वेगळं राहू लागले. पण, त्यांचा घटस्फोट झाल्याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दुसरीकडे, समंथाने 2017 मध्ये नागा चैतन्यसोबत विवाह केला होता. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि 2021 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+