Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सिकंदर नंतर सलमानच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 31 वर्षांनंतर पुन्हा एकदा आमिरसोबत दिसणार भाईजान

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा सिंकदर चित्रपट रिलीज झाल्यापासून तो सातत्याने चर्चेत आहे. भाईजानचा सिंकदर बॉक्स ऑफिसवर खास प्रभाव पाडू शकला नाही. आता सलमान खानने त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. सिकंदर नंतर सलमानचा आणखी एक चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सिंकदर चित्रपट ईदच्या निमित्ताने थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सिंकदर चित्रपटाबद्दल सलमान खान आणि सिकंदरच्या निर्मात्यांना आशा होती की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करेल. मात्र अपेक्षेनुसार बॉक्स ऑफिसवर चित्रपट कमाई करु शकला नाही.

andaz apna apna

दरम्यान 90 च्या दशकातील हा कॉमेडी चित्रपट 'अंदाज अपना अपना' नवीन ट्रेलरसह पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज आहे! दरम्यान सलमान खान-आमिर खानची जोडी तब्बल 31 वर्षांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. याबाबत सलमान खानने सोशल मिडीयावर एक पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.

सलमानने सोशल मीडियावर केली घोषणा

सलमान खानने अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक नवीन ट्रेलर शेअर केला आहे, ज्यामध्ये 'अंदाज अपना अपना' चे ताजे दृश्ये आणि शानदार बॅकग्राउंड पाहायला मिळत आहे. या ट्रेलरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "अमर प्रेम का अंदाज परत आला आहे... अंदाज अपना अपना 25 एप्रिल 2025 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होईल".

राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट 1994 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आमिर खान आणि सलमान खान व्यतिरिक्त या चित्रपटात करिश्मा कपूर, रवीना टंडन, परेश रावल आणि शक्ती कपूर देखील मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने त्यावेळेस 8.18 कोटी रुपयांची एकूण कमाई केली होती. या चित्रपटातील अनेक डॉयलॉग आजही खूप प्रसिद्ध आहेत. यामध्ये 'इसमें तेजा मैं हूं...मार्क इधर है, क्राइम मास्टर गोगो, मोगैम्बो का भतीजा, दो दोस्त एक कप में चाय पियेंगे ' असे डॉयलॉग खूप प्रसिद्ध झाले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+