Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सलमान खानने घराणेशाही बद्दल दिलं मजेशीर उत्तर, म्हणाला 'कंगनाची मुलगी...'

Salman Khan: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. बुधवारी माध्यमांशी बोलताना अभिनेत्याने चित्रपट, घराणेशाही आणि नवीन टॅलेंट बद्दल आपले मत व्यक्त केले. जेव्हा सलमानला 'सेल्फ-मेड' स्टार असल्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला,"या जगात कोणीही 'सेल्फ-मेड' स्टार नाही. हे सर्व टीमवर्क आहे. जर माझे वडील इंदूरहून मुंबईत आले नसते तर मी आज शेती करत असतो. त्यांच्या निर्णयानेच माझ्यासाठी मार्ग मोकळा झाला."

सलमान खान पुढे म्हणाला, "माझ्याकडे परत जाण्याचा पर्याय होता, पण मी इथेच राहून माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. लोक त्याला वेगवेगळी नावे देतात, जसे की घराणेशाही, जी तुम्ही लोक सहसा वापरता. मला ते खूप आवडते."

Salman Khan on kangana ranaut

एका पत्रकाराने रवीना टंडनच्या मुलीच्या बॉलिवूडमधील एंट्रीचा उल्लेख केला. सलमानने ते कंगना राणौत समजून म्हटले, "कंगनाची मुलगी येणार आहे का?" जेव्हा पत्रकारांनी चूक दुरुस्त करुन रवीनाचे नाव स्पष्ट घेतले, तेव्हा सलमानने गंमतीने म्हटलं, "जर कंगनाची मुलगी आली तर ती चित्रपट करेल की राजकारणात येईल?" जेव्हा माध्यमांनी 'घराणेशाही' हा विषय उपस्थित केला तेव्हा सलमान हसला आणि म्हणाला, "हो, त्यालाही काहीतरी करावे लागेल."

'सिकंदर' सोबतच इतर मोठे चित्रपटही ईदला प्रदर्शित होत आहेत. ईदच्या निमित्ताने 'सिकंदर' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जावे, असं आवाहन सलमान खानने केलं आहे. तो म्हणाला, "मला आशा आहे की लोकांना ईदला चांगले बोनस मिळतील जेणेकरून 'सिकंदर', मोहनलाल सरांचा 'L2: Empuraan' आणि सनी देओलचा नवीन चित्रपट 'जाट' पाहू शकतील. हे तिन्ही मोठे स्टार त्यांचे मोठे चित्रपट घेऊन येत आहेत. माझी सर्व चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळावा अशी इच्छा आहे, असं सलमानने म्हटलं आहे.

'सिकंदर' चित्रपटाची स्टारकास्ट

'सिकंदर' चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदान्ना, काजल अग्रवाल, सत्यराज आणि शर्मन जोशी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 30 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यास सज्ज आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करतो की नाही हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+