Sikandar Ticket Price: सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट 95 रुपयांत पहा, तुमचे तिकीट असे बुक करा
Sikandar Ticket Price: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट प्रदर्शित होण्यास आता काही तासच शिल्लक आहेत. हा चित्रपट उद्या म्हणजेच 30 मार्च 2025 (रविवार) रोजी ईदच्या फक्त एक दिवस आधी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भाईजानचे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सलमान खान साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगलाह चांगला प्रतिसाद मिळत आहे.
फक्त 95 रुपयांत तुम्ही 'सिकंदर' पाहू शकता
सलमानच्या चित्रपटाची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल बरीच चर्चा आहे. यामुळे महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये 'सिकंदर'च्या तिकिटांचे दर खूप महाग झाले आहेत. आता बातमी अशी आहे की, सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट तुम्ही फक्त 95 रुपयांमध्ये पाहू शकता.

दिल्ली-एनसीआरमध्ये 95 रुपयांना तिकिटे उपलब्ध
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर तुम्ही दिल्ली-एनसीआरचे रहिवासी असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. सलमान खानचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट तुम्ही फक्त 95 रुपयांमध्ये पाहू शकता. सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटासाठी रिक्लाइनर सीटची किंमत 2000 रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. मल्टीप्लेक्समध्ये तिकिटांचे दर 300 रुपयांपासून सुरू होऊन 1600 रुपयांपर्यंत जातात तर सामान्य चित्रपटगृहांमध्ये 300 रुपयांना तिकिटे उपलब्ध आहेत.
या सगळ्यात 'सिकंदर' चे तिकीट दिल्ली एनसीआरच्या डिलाईट सिनेमा हॉलमध्ये फक्त 95 रुपयांना उपलब्ध आहे. भाईजानचा चित्रपट तुम्ही मध्यभागी असलेल्या स्टॉल आणि खालच्या स्टॉलसाठी 95 रुपयांचे तिकीट खरेदी करून पाहू शकता. वरच्या स्टॉलसाठी 130 रुपये आणि बाल्कनीसाठी 180 रुपये तिकीट खरेदी करून पाहू शकता.
तुमचे तिकीट असे बुक करा
तुम्ही 'बुक माय शो' अॅपवर जाऊन दिल्ली-एनसीआर लोकेशन निवडू शकता. यानंतर तुम्हाला डिलाईट सिनेमाचा पर्याय दिसेल. येथून तुम्ही तुमच्या आवडीनुसार सेंटर स्टॉल किंवा लोअर स्टॉलसाठी 'सिंकदर'चे तिकीट आत्ताच बुक करू शकता. याशिवाय येथे इतर अनेक सिनेमागृहांचे पर्याय दिले आहेत, जिथे चित्रपट वेगवेगळ्या किंमतीत उपलब्ध आहे.
साउथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एआर मुरुगादोस दिग्दर्शित 'सिकंदर' चित्रपटाबद्दल सलमान खानचे चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाद्वारे सलमान खान जवळजवळ दीड वर्षांनी रुपेरी पडद्यावर परतत आहे. सलमान खानचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपट ठरू शकतो. या चित्रपटाकडून लोकांनाही खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर, काजल अग्रवाल, सत्यराज आणि अंजनी धवन हे देखील महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.












Click it and Unblock the Notifications