बरगड्याच्या दुखापतीनंतरही सलमानने पूर्ण केले 'बम बम बोले'चे शूटींग; 'सिकंदर'चा तो व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'सिकंदर' हा नवा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. 'बम बम भोले' हे या चित्रपटाती खास गाणे होळीसाठी प्रदर्शित करण्यात आल्यानंतर या चित्रपटाची चर्चा वाढली होती. याच गाण्याच्या शूटिंग दरम्यान सलमानच्या बरगड्याला दुखापत झाली होती. मात्र या आजारातूनही सलमान खानने या चित्रपटाचे व या गाण्याचे शुटींग पूर्ण केले. सध्या याच दुखापतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओत
या व्हिडीओत ५९ वर्षीय सलमान त्याच्या वेदना कमी करण्यासाठी सतत त्याच्या बरगड्यांना स्पर्श करताना दिसत आहे. दरम्यान, खानने बुधवारी (१२ मार्च) रात्री त्याच्या ६० व्या वाढदिवसाच्या आधी त्याचा जवळचा मित्र आणि अभिनेता आमिर खानला भेटला. या अनधिकृत भेटीत शाहरुख खानही त्याच्यासोबत होता.बरगड्यांना दुखापत झाली असतानाही सलमानने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्याचा दावा या व्हिडीओतून करण्यात आला आहे.
This is what we call Commitment! Salman Khan shot Bum Bum Bole song with broken ribs. #salmankhan #salmankhanuniverse #bumbumbole pic.twitter.com/HuwgFOwegK
— Salman Khan Universe Fan Club (@salmanuniv) March 12, 2025
ईदला होणार प्रदर्शित
खानच्या 'सिकंदर' चित्रपटात सलमान खान पुन्हा एकदा एका मोठ्या अॅक्शन हिरोची भूमिका साकारत आहे. चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना आहे. सुनील शेट्टी, शर्मन जोशी, सत्यराज आणि प्रतीक बब्बर हे इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवालाच्या बॅनरखाली निर्मित, सिकंदर हा चित्रपट २८ मार्च रोजी ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होणार आहे.












Click it and Unblock the Notifications