पहलगाम हल्ल्यानंतर अरिजीत, श्रेयासह सलमान खानने घेतला 'हा' मोठा निर्णय, चाहत्यांची माफीही मागितली

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सगळ्या जगाने या घटनेची निंदा केली. बाॅलिवूडसाठीही हा मोठा धक्का होता. या हल्लानंतर बाॅलिवूडमधील अनेक दिग्गजांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. आता सलमान खानने एक मोठे पाऊल उचलले आहे. त्याने त्याचा युके दौरा रद्द केला आहे. 'द बिग बॉलीवूड वन' अंतर्गत सलमान खानचे शो ४ आणि ५ मे रोजी यूकेमध्ये होणार होते. पण आता त्यांनी ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Salman Khan s decision

सलमानचा कार्यक्रम रद्द

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे सलमान खानने मोठा निर्णय घेतला आहे. 'द बिग बॉलीवूड वन' अंतर्गत सलमान खानचे शो युकेमध्ये ४ आणि ५ मे रोजी होणार होते. परंतु आता त्यांनी ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान खानने सोमवारी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर याबाबतची माहिती पोस्ट केली. त्यांनी सांगितले की, या दुःखाच्या काळात थांबणे योग्य आहे. शोच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असेही त्यांनी सांगितले.

शेअर केले पोस्टर

सलमान खानने 'द बिग बॉलीवूड वन' च्या यूके टूरचे पोस्टर शेअर केले आहे. या कार्यक्रमात सलमान खानसोबत सारा अली खान, टायगर श्रॉफ, वरुण धवन, माधुरी दीक्षित नेने, कृती सेनन, दिशा पटानी, सुनील ग्रोव्हर आणि मनीष पॉल हेही युकेला जाणार होते. पोस्टरवर 'पोस्टपाँण्ड' असे लिहिले आहे. सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'काश्मीरमधील अलिकडच्या दुःखद घटनांमुळे आणि मोठ्या दुःखाने आम्ही ४-५ मे रोजी मँचेस्टर आणि लंडनमध्ये होणारा 'द बॉलिवूड बिग वन शो' पुढे ढकलण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.'

काय म्हणाला सलमान?

सलमान खानसोबत या कार्यक्रमातील इतर कलाकारही युकेला जाणार नाहीत. सलमानने पुढे लिहिले की, 'आमच्या चाहत्यांनी या शोसाठी किती वेळ वाट पाहिली हे आम्हाला समजते. परंतु आम्हाला वाटते की या दुःखाच्या काळात थांबणे योग्य आहे. कोणत्याही निराशेबद्दल किंवा गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत. तुमच्या समजुती आणि पाठिंब्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. शोच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. पहलगाम हल्ल्यानंतर अरिजीत सिंग आणि श्रेया घोषाल यांनी त्यांचे संगीत कार्यक्रम रद्द केले आहेत. श्रेया घोषालने तिच्या ऑल हार्ट्स टूरचा भाग म्हणून सुरतमधील तिचा आगामी कॉन्सर्ट रद्द करण्याची घोषणा केली आहे, तर अरिजीतने २७ एप्रिल रोजी चेन्नईमध्ये होणारा त्याचा कॉन्सर्ट रद्द केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+