Salman Khan : सलमान खानला मेंदुचे दोन गंभीर आजार! जाणून घ्या लग्न अन् घटस्फोटावर काय म्हणाला भाईजान?
Salman Khan : बाॅलीवूडचा सुपरस्टार आणि भाईजान या टोपननावाने प्रसिद्ध असलेला सलमान खानची सिने कारकीर्द फारच सोनेरी आहे. तो जेवढा कलाकार म्हणून मोठा आहे तेवढाच अभिनयासोबतच मनमोकळ्या स्वभावाचाही आहे. सलमान खान नुकताच कपिल शर्माच्या नेटफ्लिक्स वर सुरू झालेल्या शो मध्ये पाहुणा म्हणून त्यात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने त्याच्या चित्रपटांबद्दल आणि आयुष्याबद्दल उघडपणे काही वक्तव्य केले आहेत..
सलमान खानने या शो मध्ये मनमोकळेपणाने काही गोष्टींवर भाष्य केले, यामध्ये त्याने आपल्या लग्नाबाबत आणि आजारावर तो बोलला. सलमानने सांगितले की, गंभीर आजारांनी ग्रस्त आहे. सलमानला 'ब्रेन एन्युरिझम' आणि 'ट्रायजेमिनल न्यूराल्जिया' नावाचा आजार आहे.

घटस्फोट अन् लग्नावर काय म्हणाला भाईजान?
कपिल शर्मा आणि त्याच्या टीमसोबत चर्चा करताना सलमान खानने मोठ्या दिलखुलास पद्धतीने त्याचं लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दलचं मत व्यक्त केले. तो म्हणाला की, आजकाल लहान-सहान गोष्टींवरून पती-पत्नीचे घटस्फोट होतात. तो विनोदाने म्हणाला की, घटस्फोट ठीक आहे, पण पत्नी अर्धे पैसे घेऊन निघून जाते. भाईजानचे हे वक्तव्य ऐकताच हशा पिकला.
आजाराबद्दल काय म्हणाला सलमान?
भाईजानने आप्या आरोग्याच्या समस्यांबद्दल बोलताना काही गोष्टी शेअर केल्या. तो म्हणाला, "आपण दररोज हाडे मोडत आहोत. बरगड्या तुटल्या आहेत, ट्रायजेमिनल न्यूराल्जियाचा सामना करत आहोत. मेंदूमध्ये एन्युरिझम आहे, त्याच्या उपचारांवर काम करत आहे. एव्ही मालफार्मेशन असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. हे सर्व माझ्या आयुष्यात चालू आहे आणि जिथे त्याचा मूड खराब झाला. जर हे लहान वयात घडले असते तर ते ठीक झाले असते असेही तो म्हणाला.
होती एपीजे अब्दुल कलाम यांची प्रेरणा
सलमानने तेरे नाम चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातून त्याची हेअरस्टाईल खूप प्रसिद्ध झाली. जी दोन दशकांनंतरही ट्रेंडमध्ये आहे. याबद्दल सलमान खान म्हणाला, माझ्या तेरे नामचा लूक प्रत्यक्षात एपीजे अब्दुल कलाम यांची प्रेरणा यामागे माझ्या मनात होती. मला वाटायचे की लहान शहरांचे नायक लांब केस ठेवायचे. सर्व जुन्या नायकांनीही ते असेच ठेवले. ही प्रेरणा तिथूनच मिळाली.
सलमान खान शेवटचा 'सिकंदर' चित्रपटात दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही. आता तो लवकरच गलवान व्हॅलीमध्ये घडलेल्या घटनेवर आधारित चित्रपटावर काम सुरू करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जुलैमध्ये सुरू होऊ शकते.












Click it and Unblock the Notifications