रमजान महिन्यात सलमान खानच्या हातावर राम जन्मभूमीची घडयाळ, किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का !
Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. भाईजानचे चाहते त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खानचा हा चित्रपट 30 मार्च 2025 (रविवार) रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाच्या प्रीमियरबद्दल लोक खूप उत्सुक असल्याचे दिसून येते. दरम्यान सलमान खानच्या हातावर भगवान श्रीरामाची झलक दिसली आहे.
रामजन्मभूमीच्या घड्याळाने लोकांचे लक्ष वेधले
सलमान खानला नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमात आला होता. त्यावेळी तो अतिशय स्टायलिश ड्रेसमध्ये दिसला. भाईजान या फोटोत क्लीन शेवमध्ये स्मार्ट दिसत आहे. यावेळी सलमानच्या हातात जेकब अँड कंपनी एपिक एक्स राम जन्मभूमी रोझ गोल्ड एडिशन असलेली घड्याळ सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

रमजान महिन्यात सलमान खानच्या हातातवर भगवान 'श्री राम'
रमजानच्या महिन्यात सलमान खानचे चाहते त्याच्या हातात श्रीरामाचे घड्याळ पाहून खूप आनंदी झाले आहेत. सलमान खानचे नवीन फॅशन स्टेटमेंट पाहून लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत. या मूर्तीवर भगवान राम, हनुमान आणि इतर अनेक हिंदू देवतांच्या प्रतिमा आहेत. डायलवर 'जय श्री राम' असे लिहिलेले आहे, ही घडयाळ खूपच सुंदर दिसत आहे. सलमान खानच्या या पोस्टवर लोक खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
सलमान खानच्या 'श्री राम' घड्याळाची चर्चा
सलमान खानने घातलेले घड्याळ टायटॅनियम एडिशन 2 आहे, ज्याची किंमत सुमारे 34 लाख रुपये आहे. काही महिन्यांपूर्वी अभिषेक बच्चनच्या मनगटावरही हे घड्याळ दिसले होते. हे घड्याळ घालून अभिषेक बच्चन इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) सीझन 2 च्या लाँचिंगला उपस्थित होता.
आता सुपरस्टार सलमान खाननेही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लोकांना या अद्भुत घड्याळाची झलक दाखवली आहे. त्याने इंस्टाग्रामवर घड्याळ घातलेला त्याचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 30 मार्च 2025 रोजी थिएटरमध्ये भेटू.
सलमान खानची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक या पोस्टवर भरभरून कमेंट करत आहेत आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत. व्हायरल फोटोमध्ये दिसणारा सलमान खान नेव्ही ब्लू शर्ट दिसतोय. या अभिनेत्याने त्याचा खास लूकही दाखवला आहे. तसेच भगव्या रंगाच्या घड्याळाच्या बेल्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.












Click it and Unblock the Notifications