अगोदर पटकथा चोरीची चर्चा, आता थेट 'तो' सीन चोरल्याची अफवा; का होताहेत सलमानच्या 'सिकंदर'वर आरोप?
ईद निमित्ताने प्रदर्शित होणार्या सलमानच्या सिकंदरची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सलमान खानचा आगामी चित्रपट 'सिकंदर' हा थलापती विजयच्या 'सरकार' चा रिमेक असल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला होता. दिग्दर्शक एआर मुरुगादोस यांनी तो आरोप नाकारला. ही चित्रपट रिमेक नाही, तर एक नवीन कथा आहे, असं त्यावेळी मुरुगादोस यांनी स्पष्ट केलं होतं. आता सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत एक नवीनच चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटातील एक दृश्य बांगलादेशी चित्रपटातून कॉपी केलं आहे, असा आरोप आता होऊ लागला आहे.

जोहरा जबी गाण्यावर चर्चा
काही दिवसांपूर्वी सलमानने त्याच्या चित्रपटातील 'जोहरा जबीं' नावाचे एक गाणे रिलीज केले होते. या गाण्यात सलमान आणि रश्मिका मंदान्ना यांची जोडी जमली आहे. या गाण्यात सलमान काळ्या कुर्ता घालून नाचताना दिसला. आता या गाण्याच्या दृश्याबद्दल असे म्हटले जात आहे की ते बांगलादेशी चित्रपट 'प्रियोतोमा' मधून हा लूक कॉपी करण्यात आला आहे. अशा प्रकारची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजली आहे. युजर्स याबाबतचे पुरावेही देत आहेत.
नेमके काय आहेत पुरावे?
'प्रियोतोमा' या गाण्याचा सीनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया वापरकर्ते दोन्ही चित्रपटांची गाणी एकत्र शेअर करत आहेत आणि लिहित आहेत की ' सिकंदर'चा हा सीन या चित्रपटातून घेण्यात आला आहे. एवढेच नाही तर 'जोहरा जबीं' या गाण्यात सलमानने घातलेला कुर्ताही 'प्रियोतोमा' चित्रपटातील अभिनेत्यासारखाच आहे. 'प्रियोतोमा' हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये शाकिब खान आणि इधिका पॉल मुख्य भूमिकेत होते. गाण्यात फक्त शाकिब दिसतोय. या चित्रपटातील ज्या गाण्याशी 'जोहरी जबीन' जोडले जात आहे त्याचे शीर्षक 'कुर्बानी-कुर्बानी' आहे.
Sharam where ? @BeingSalmanKhan #Sikandar
— Rizwan Khan SRK (@fromepiglottis) March 20, 2025
Bangladeshi film se chori karta hai 🤡 pic.twitter.com/AgDCdwxhjQ
ईदला होणार प्रदर्शित
'सिकंदर' हा या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट काही दिवसांतच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. निर्मात्यांनी नुकतीच या चित्राच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ३० मार्चपासून तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकाल. एआर मुरुगदास दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. या चित्रपटात सत्यराज देखील दिसणार आहे. तो खलनायकाची भूमिका साकारत आहे.












Click it and Unblock the Notifications