Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पनवेल फार्महाऊसपासून ते गॅलेक्सी अपार्टमेंटपर्यंत, बॉलिवूडच्या भाईजानची संपत्ती ऐकून बसेल धक्का

Salman Khan Birthday: बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या दमदार चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असतो. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आज वाढदिवस आहे. तो आता 59 वर्षाचा झाला आहे. मागील काही दिवसांपुर्वी सलमानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

सलमान खानचा 59 वा वाढदिवस

सलमान खानची फॅन फॉलोइंग पाहण्यासारखी आहे. भाईजानची एक झलक पाहण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. जगभरात त्यांचे करोडो चाहते आहेत. आज सलमान खान त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. या वयातही सलमान खानने अद्याप लग्न केलेले नाही आणि मुली अजूनही त्याच्या प्रेमात पडतात.

salman khan Birthday

सलमान खानचं बॉलिवूड करिअर

सलमान खानने 1988 मध्ये 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र 1989 मध्ये 'मैने प्यार किया' या त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाने त्यांना रातोरात सुपरस्टार बनवले. 2024 मध्ये सलमानने हिंदी चित्रपटसृष्टीत 36 वर्षे पूर्ण केली आणि या सर्व गौरवशाली वर्षांत त्याने भारतीय प्रेक्षकांना अनेक अविस्मरणीय आणि सदाबहार चित्रपट दिले आहेत.

सलमान खानची एकूण संपत्ती

सलमान खान बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमान खान देखील आज एक ब्रँड बनला आहे. भाईजानने आपल्या मेहनतीने करोडोंची संपत्ती कमावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमान खान जवळपास 3000 कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीचा मालक आहे. चित्रपटांव्यतिरिक्त सलमान खान अनेक ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये देखील दिसतो. या जाहीरातीतून त्याला मोठी कमाई होते. त्याचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊसही आहे.

या महागड्या वस्तूंचा मालक आहे सलमान खान

-सलमान खानकडे अनेक अनमोल गोष्टी आहेत. त्यांचे मुंबईतील वांद्रे भागात एक आलिशान अपार्टमेंट आहे. सलमान खानच्या सी फेसिंग ट्रिपलेक्स गॅलेक्सी अपार्टमेंटची किंमत 100 कोटी रुपये आहे.

-सलमान खान निसर्गप्रेमी आहे. त्यांचा महाराष्ट्रातील गोराई भागात समुद्र किनारी बंगला आहे. जो त्यांच्यासाठी थेरपी सेंटर म्हणून काम करतो. या आलिशान 5 BHK बंगल्यात जिम, थिएटर आणि स्विमिंग पूल आहे. या आलिशान बंगल्याची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे.

-सलमान खानचे पनवेलमध्ये एक सुंदर फार्महाऊसही आहे. त्यांची मालमत्ता 150 एकर जमिनीवर पसरली असून त्याला येथे शेती करायलाही आवडते. भाईजान त्याच्या फार्महाऊसवर बराच वेळ घालवतो. तसेच त्याच्या जवळच्या लोकांसाठी अनेक पार्टी आयोजित करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याच्या पनवेल फार्महाऊसची किंमत जवळपास 80 कोटी रुपये आहे.

सलमान खानला महागड्या गाड्यांची आवड

-भाईजानच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेंझ एस क्लास 82 लाख, ऑडी ए8 एल (13 कोटी), BMW X6 (1.15 कोटी), टोयोटा लँड क्रूझर (1.29 कोटी), ऑडी RS7 (1.4 कोटी), रेंज रोव्हर (2.06 कोटी), Audi R8 (2.31 कोटी) आणि Lexus LX470 (2.32 कोटी) अश्या अनेक करोडो रुपये किंमतीच्या लक्झरी गाड्या त्यांच्याकडे आहेत.

-सलमान खान एका आलिशान यॉटचाही मालक आहे. 2016 मध्ये त्यांनी त्यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त स्वत:ला एक नौका भेट दिली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमान खानने 3 कोटी रुपये खर्च करून ती खरेदी केली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+