राणी मुखर्जी, तमन्ना भाटीयाला सिनेमात ब्रेक देणारे सलीम अख्तर यांचे निधन
Salim Akhtar passed away : सुपरस्टार अभिनेता मनोज कुमार यांच्या निधनानंतर बाॅलीवूडकरांसाठी आणि चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली. प्रसिद्ध निर्माते सलीम अख्तर यांचे निदन झाले आहे.
सलीम अख्तर सत्तर - ऐंशीच्या दशकातील प्रसिद्ध निर्माते होते. सलीम अख्तर यांनी प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी, तमन्ना भाटिया यांना ब्रेक दिला होता तसेच अनेक अभिनेते, अभिनेत्री आणि कलाकार इंडस्ट्रीत लॉन्च केले होते.

सात दिवसांत बाॅलीवूडला दोन धक्के Salim Akhtar passed away
मनोज कुमार यांच्या निधनानंतर सलीम अख्तर यांचे निधन चित्रपटसृष्टीचे आणखी एक मोठे नुकसान आहे. ही धक्कादायक गोष्ट ऐकल्यानंतर चित्रपटसृष्टी हळहळली असून अनेकजण प्रतिक्रीया व्यक्त करत आहेत.
सलीम अख्तर यांच्यावर आज अंत्यसंस्कार
आज दुपारी 1.30 वाजता जोहरच्या नमाजनंतर इर्ला मशिदीजवळील कब्रस्तानमध्ये निर्माते सलीम अख्तर यांचा दफनविधी होणार आहे.
काय होता सलीम अख्तर यांना आजार?
सलीम अख्तर हे काही दिवसांपासून आजारी होते. रुग्णालयात त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. ते जीवन मरणाच्या दारात होते अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
साधा सरळ माणूस...
इंडस्ट्रीतील लोक त्यांना त्यांच्या साध्या आणि सरळ वागण्यामुळे ओळखत होते. सलीम खान यांनी 1980 आणि 1990 च्या दशकात उत्कृष्ट निर्माता म्हणून काम केले. आपल्या प्रोडक्शन हाऊस 'आफताब पिक्चर्स'च्या बॅनरखाली सलीम अख्तर यांनी असे अनेक चित्रपट केले. रसिकांनी त्यांचे चित्रपट डोक्यावर घेतले होते. राणी मुखर्जीसह तमन्ना भाटियाला पहिला ब्रेक त्यांनी सिनेमात दिला होता. सलीम अख्तर यांच्या निधनामुळे बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते सोशल मीडिया यूजर्सपर्यंत सर्वच जण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.












Click it and Unblock the Notifications