Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'सैयारा' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 17 दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई, या चित्रपटांना टाकले मागे!

Saiyaraa box office collection : मोहित सुरी दिग्दर्शित आणि अहान पांडे व अनित पद्ढा यांच्या मुख्य भूमिका असलेला 'सैयारा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे.

18 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 17 दिवसांतच 299 कोटींपेक्षा जास्त कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

विशेष म्हणजे कोणत्याही मोठ्या स्टारकास्टशिवाय या चित्रपटाने बजेटपेक्षा चार पट जास्त कमाई केली असून, आता तो 300 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच सामील होईल अशी अपेक्षा आहे.

Saiyaraa Crosses    299 Crore in 17 Days

बॉक्स ऑफिसवर 'सैयारा'ची यशस्वी घोडदौड

चित्रपटाने त्याच्या १७ व्या दिवशी ८ कोटी रुपयांची कमाई केली आहे, जी शनिवारच्या तुलनेत चांगली वाढ दर्शवते. यामुळे 'सैयारा'चा एकूण कलेक्शन २९९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. चित्रपटाची एकूण ऑक्युपन्सी ३९.१०% असून, प्रेक्षकांचा प्रतिसाद आजही उत्तम असल्याचे दिसून येते.

'सैयारा'च्या कमाईवर काहीही परिणाम झालाच नाही

या यशामागे आणखी एक विशेष बाब म्हणजे, 'सैयारा'ला अलीकडेच प्रदर्शित झालेल्या दोन मोठ्या चित्रपटांकडून स्पर्धेचा सामना करावा लागला. यामध्ये अजय देवगण आणि रवी किशन यांचा 'सन ऑफ सरदार २' तसेच सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा 'धडक २' यांचा समावेश आहे. मात्र, या नवीन चित्रपटांचा 'सैयारा'च्या कमाईवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही.

इतर चित्रपटांची कमाई

'सन ऑफ सरदार २'

अजय देवगणच्या सन ऑफ सरदार-२ चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 9.25 कोटी रुपयांची कमाई करत एकूण 24,75 कोटींचा टप्पा गाठला आहे.

'धडक २'

1 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या 'धडक २' ने तिसऱ्या दिवशी 4.25 कोटींचा व्यवसाय केला असून, त्याचा एकूण कलेक्शन 11.50 कोटी रुपये झाला आहे.

एकूण कमाईच्या बाबतीत 'सैयारा' अजूनही 'सन ऑफ सरदार 2' आणि 'धडक 2' पेक्षा खूपच पुढे आहे, आणि 17 दिवसानंतरही त्याची जादू बॉक्स ऑफिसवर कायम आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+