Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Saif Ali-Kareena Kapoor: बॉलिवूडच्या 'नवाब ​​कपल'कडे किती संपत्ती, सैफ-करीनामध्ये कोण जास्त श्रीमंत?

Saif Ali Khan-Kareena Kapoor Net Worth: बॉलिवूड अभिनेता आणि छोटे नवाब सैफ अली खानवर काल मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास चाकू हल्ला करण्यात आला आहे. आज सकाळी सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मध्यरात्री सैफवर हल्लेखोराने चाकूने सपासपा 6 वार केले आहेत, त्यापैकी दोन वार गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी जोडप्यांपैकी एक असलेली सैफ अली खान आणि करीना कपूर खान या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या पॉवरफूल कपलच्या आश्चर्यकारक संपत्तीमुळेही ते अनेकदा चर्चेत राहतात.

saif ali khan kareena kapoor khan

मध्य प्रदेशातील पतौडी घराण्याचे वारस आणि 10 वे नवाब सैफ अली खान हे देखील बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. कपूर घराण्याची लाडकी त्यांची पत्नी करीना ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. या दोघांची एकूण संपत्ती 1,600 कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे ते बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत जोडप्यांपैकी एक बनले आहेत.

सैफ अली खानची संपत्ती अंदाजे 150 मिलियन (सुमारे 1,114 कोटी) आहे. त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे त्याचा अभिनय कारकीर्द आणि ब्रँड एंडोर्समेंट. याशिवाय त्यांच्या मालमत्तेत हरियाणामधील प्रसिद्ध पतौडी पॅलेसचाही समावेश आहे ज्याची किंमत सुमारे 800 कोटी आहे. सैफ त्याच्या नवाबी शैली आणि लक्झरी जीवनशैलीसाठी ओळखला जातो.

बॉलिवूडची टॉप अभिनेत्री करीना कपूर खान

बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली करिना कपूर खानची एकूण संपत्ती 400 कोटी आहे. त्याचे उत्पन्न चित्रपट, जाहिराती आणि टेलिव्हिजन शोमधून येते. करीना तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तसेच तिच्या स्टाइल आणि ग्लॅमरसाठी ओळखली जाते.

बॉलीवूडमधील शाही जोडपे

सैफ आणि करीनाची संपत्ती आणि यश त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीत एक पावरफूल कपल आहे. त्याची आलिशान जीवनशैली, आलिशान घरे आणि लक्झरी गाड्या अनेकदा बातम्यांमध्ये चर्चेत असतात. हे जोडपे त्यांच्या चित्रपटांमुळे, कुटुंबामुळे आणि संपत्तीमुळे नेहमीच चर्चेत असते आणि त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात त्यांचे विशेष स्थान आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+