सागरिकाचे वडील अन् झहीर खानच्या पहिल्या भेटीचा किस्सा माहितीये का?
झहीर खान हा भारताचा माजी क्रिकेटपटू. आपल्या स्विंग गोलंदाजीच्या जोरावर क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य करणारा खेळाडू. झहीर खानवर भारतीय क्रिकेटचे चाहते भरभरून प्रेम करतात. झहीर तसा मूळचा महाराष्ट्रातील श्रीरामपूरचा. त्यामुळं महाराष्ट्रातील त्याचं कनेक्शन अजूनचं वेगळं आहे. महाराष्ट्रातही त्याचे लाखो चाहते आहेत. झहीर खानने अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत लग्न केलं आहे.
ती सुद्धा मराठी आहे. या जोडप्यानं आता चाहत्यांना एक गोड बातमी दिलीय. सागरिकानं एका गोडंस मुलाला जन्म दिलाय. इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत जोडप्यांना चाहत्यांना ही गोड बातमी दिलीय. या मुलाचं नाव सुद्धा तेवढचं इंटरेस्टिंग ठेवण्यात आलयं. फतेहसिंह खान असं या मुलाचं नाव असल्याचं झहीर खानं पोस्टमध्ये म्हटलंय. आता झहीर खान आणि सागरिकाच्या प्रेमाचे अनेक किस्से सगळ्यांनीच ऐकले असतील. मात्र सागरिकाचे वडिल आणि झहीरच्या भेटीचा किस्सा या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चक दे इंडियाच्या प्रीती सबरवालला कोण ओळखत नाही? फक्त एकाच चित्रपटातून तिला इतकी लोकप्रियता मिळाली होती की सगळेच तिच्यासाठी वेडे झाले होते. प्रीतीची भूमिका सागरिका घाटगेनं साकारली होती. सागरिकाचं वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत राहिलं आहे. झहीर खानसोबतची तिची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.
कुठे झाली झहीर-सागरिकाची पहिली भेट
झहीर आणि सागरिका यांची पहिली भेट मित्रांद्वारे झाली. दोघांची ओळख कॉमन फ्रेंड्सनी करून दिली होती. पहिल्या भेटीनंतर झहीरच्या मित्रांनी सागरिकाचे नाव घेऊन त्याला चिडवायला सुरुवात केली पण तोपर्यंत त्यांची मैत्रीही झाली नव्हती. झहीरनं एकदा सागरिकाला डीनरसाठी बोलावलं. त्यानंतर, हळूहळू त्यांची मैत्री वाढत गेली आणि ते एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले.
झहीरनं गोव्यात सागरिकाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. २०१७ मध्ये झहीर आयपीएलमध्ये व्यस्त होता पण तो थोडा वेळ काढून सागरिकासोबत गोव्याला गेला. जिथे त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केलं. साखरपुड्यानंतर, सागरिकानं अंगठी घातलेला स्वतःचा फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केलं.
अशी होती सागरिकांच्या वडिलांसोबतची पहिली भेट
सागरिका हिंदू कुटुंबातील आहे आणि झहीर मुस्लिम कुटुंबातील. त्यांना लग्न करणं थोडं कठीण होतं. सागरिकाच्या आईला त्यांच्या नात्याबद्दल आधीच माहिती होती पण जेव्हा तिचे वडील झहीरला पहिल्यांदा भेटले तेव्हा ही भेट २० मिनिटे चालणार होती पण ती ३ तास चालली. त्यानंतर, सागरिकाच्या वडिलांनी होकार दिला आणि दोघांनी लग्न केलं. झहीर आणि सागरिकाने २७ नोव्हेंबर २०१७ रोजी कोर्ट मॅरेज केलं होतं आणि आता ते आनंदी आयुष्य जगत आहेत. आता त्यांना फतेहसिंह खान या गोड मुलाला ही जन्म दिला आहे.
सागरिकाला राजघराण्याचा वारसा
अभिनेत्री सागरिका घाटगेचा जन्म ८ जानेवारी १९८६ ला झाला. सागरिका घाटगे राजघराण्यातील आहे. ती कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या राजघराण्यातील आहे. सागरिकाचे वडील विजयेंद्रसिंह घाटगे यांची आई म्हणजेच सीता राजे घाटगे या इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर तिसरे यांच्या कन्या आहेत. सागरिका वयाच्या आठव्या वर्षापर्यंत कोल्हापुरात राहिली. त्याचबरोबर, विजयेंद्र घाटगे हे हिंदी चित्रपटसृष्टी आणि भारतीय टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेते देखील आहेत.












Click it and Unblock the Notifications