RJ simran singh death : सिमरनच्या मृत्यूपुर्वीच 'ती' शेवटची पोस्ट चर्चेत, ओमर अब्दुलांची श्रद्धांजली
RJ simran singh death : प्रसिद्ध आरजे सिमरन सिंग 26 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममधील तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. आरजे सिमरन सिंग हिने आत्महत्या केली आहे की तिची हत्या करण्यात आली? याचा खुलासा अद्याप झालेला नाही. गुरुग्राम पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
आरजे सिमरन सिंग ही मूळची जम्मू-काश्मीरमधील नानक नगरची रहिवासी होती. ती दिल्ली-एनसीआरच्या लोकप्रिय रेडिओ जॉकींपैकी एक होती. जम्मू की धडकन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आरजे सिमरन सिंगचे इंस्टाग्रामवर चांगले फॅन फॉलोअर आहे. सिमरनने तिच्या मृत्यूच्या तेरा दिवस आधी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती, ज्याचा अर्थ तिच्या मृत्यूनंतर काढला जात आहे.

आरजे सिमरनच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरची शेवटची पोस्ट
आरजे सिमरनच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरची शेवटची पोस्ट 13 डिसेंबरला होती, ज्यामध्ये ती आनंदाने गाउनमध्ये फिरताना दिसली होती. शेवटच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये, सिमरनने लिहिले -Just a girl with endless giggles and her gown, taking over the beach (अंतहीन हसणारी मुलगी आणि तिचा गाऊन, समुद्रकिनारा घेत आहे)
..अन् अंतहिन हास्य बनले शेवटचे हास्य
इंस्टाग्रामवर आरजे सिमरन सिंगच्या शेवटच्या पोस्टचे कॅप्शन म्हणजे अंतहीन हास्य - 'नेव्हर एंडिंग लाफ्टर' आणि अवघ्या 13 दिवसांनी हा हसरा चेहरा सर्वकाळ आणि सदैव शांत झाला. सिमरनच्या मृत्यूच्या वृत्तानंतर तिच्या इन्स्टाग्रामवरील कमेंट सेक्शनमध्ये असंख्य शोकसंदेशाच्या पोस्ट पडल्या आहे. एका यूजरने मार्मिकपणे कमेंट केली की, "एवढी आनंदी दिसणारी व्यक्तीचा असा कसा मृत्यू होऊ शकतो?"
सिमरनच्या इंस्टाग्रामवर 684K फॉलोअर्स
आरजे सिमरन गुरुग्रामच्या सेक्टर 47 मध्ये असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. तिच्या एका मित्राच्या माहितीवरून पोहोचलेल्या गुरुग्राम पोलिसांनी अपार्टमेंटमधून आरजे सिमरनचा मृतदेह बाहेर काढला. पोलिस तपासातच मृत्यूचे खरे कारण समजेल. इंस्टाग्रामवर सिमरनचे 684 k फॉलोअर्स आहेत. ती एंटरटेनमेंट रील्सही बनवायची.
जम्मू की धडकनला श्रद्धांजली
RJ सिमरन सिमरन सिमरन सिंगला तिच्या चाहत्यांनी "जम्मू की धडकन" असे म्हटले कारण तिच्या या प्रदेशातील लोकप्रियतेमुळे. फ्रीलान्स रेडिओ जॉकी बनण्यापूर्वी तिने एका प्रसिद्ध रेडिओ स्टेशनवर काम केले आहे. इंस्टाग्रामवरील तिच्या विनोदी कंटेंटमुळे ती अनेक युजर्समध्ये लोकप्रिय होती.
Dr. Farooq Abdullah, President of the JKNC, and Vice President and Chief Minister @OmarAbdullah along with Deputy CM @Surinderch55 have expressed profound grief over the tragic & untimely demise of Simran Singh, popularly known as RJ Simran and lovingly referred to as "Jammu ki…
— JKNC (@JKNC_) December 26, 2024
CM ओमर अब्दुला यांनी व्यक्त केले दुःख
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सिमरनच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सने जारी केलेल्या निवेदनात या कठीण काळात सिमरनचे कुटुंब आणि मित्रांप्रती मनापासून शोक व्यक्त केला आहे. फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, "सिमरनचा आवाज आणि करिष्मा जम्मू आणि काश्मीरच्या भावनेशी जुळणारा होता." तिने या प्रदेशाच्या सांस्कृतिक जडणघजणात योगदान दिले आहे. तिचे कार्य सर्वांच्या स्मरणात राहतील.












Click it and Unblock the Notifications