Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विमानतळावर तगडी सेटिंग, रान्या रावची प्रत्येक ट्रिपला 13 लाखांची कमाई , 15 दिवसांत 4 वेळा दुबई ट्रीप

Actress Ranya Rao: प्रसिद्ध कन्नड आणि तमिळ चित्रपट अभिनेत्री रान्या राव हिला सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने तिला 14.2 किलो विदेशी सोन्यासह रंगेहाथ पकडले आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 12.56 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रान्या गेल्या एका वर्षात 30 वेळा दुबईला गेला होती आणि प्रत्येक वेळी ती सोने घेऊन भारतात परतत होती. तस्करी केलेल्या सोन्यामागे तिला प्रत्येक किलोला 1 लाख रुपये मिळत होते. तसेच प्रत्येक ट्रिपला तिला 12-13 लाख रुपये कमवत असे. या तस्करीसाठी तिने आपल्या कणखर मनाचाही वापर केला होता. अभिनेत्रीने एक खास मॉडिफाइड जॅकेट आणि मनगटाचा पट्टा वापरला होता.

Ranya Rao

विमानतळ होती तगडी सेटिंग, पण तरीही ती पकडली गेली

बंगळुरू विमानतळावर तैनात असलेल्या कॉन्स्टेबल बसवराजने रान्या रावला मदत करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले. जेव्हा अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्यांना ओळखले दाखवत म्हणाला तुम्हाला माहिती आहे का हे लोक कोण आहेत? ती डीजीपी रामचंद्र राव यांची मुलगी आहे. दरम्यान डीआरआय अधिकाऱ्यांनी शोध घेतला घेत संपूर्ण तस्करी उघडकीस आणली.

15 दिवसांत 4 वेळा दुबई ट्रीप

रान्याने अलिकडेच ताज वेस्ट एंड हॉटेलमध्ये एक भव्य लग्न केले होते, त्यानंतर तिच्या दुबईला वारंवार भेटींमुळे संशय निर्माण झाला. कोणताही व्यवसाय नसताना गेल्या 15 दिवसांत ती दुबईला चार वेळा गेली. दरम्यान लव्हेल रोडवरील तिचे नवीन आलिशान अपार्टमेंट आणि महागडी जीवनशैलीनेही अधिकाऱ्यांचे लक्ष वेधलं आहे.

अभिनेत्रींच्या घरी छाप्यांमध्ये जप्त केले कोट्यावधी रुपये

रान्या रावच्या अटकेनंतर डीआरआयने त्याच्या घरावर छापा टाकून 2.67 कोटी रुपये रोख आणि 2.06 कोटी रुपये किमतीचे सोने असलेले तीन मोठे बॉक्स जप्त केले आहेत. संपूर्ण जप्तीची किंमत 17.29 कोटी रुपये इतकी आहे. सध्या तिला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

हे प्रकरण फक्त रान्यापुरते मर्यादित आहे की, मोठ्या तस्करी रॅकेटशी जोडलेले आहे हे तपास यंत्रणा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये राजकारण, व्यवसाय आणि पोलिस विभागातील मोठी नावेही सामील असू शकतात असा अधिकाऱ्यांना संशय आहे.

कोण आहे रान्या राव ?

रान्या राव ही कन्नड आणि तमिळ चित्रपटांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती आयपीएस अधिकारी आणि कर्नाटक राज्य पोलिस गृहनिर्माण महामंडळाचे महासंचालक रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. अटकेनंतर राव यांनी संपूर्ण प्रकरणापासून स्वतःला दूर केले आहे. ते म्हणाला की रान्या आमच्यासोबत राहत नाही, मलाही तस्करीबद्दल ऐकून आश्चर्य वाटले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+