Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Raid 2 : रेड-2 फिल्मसाठी अजय देवगनची फी वाचून व्हाल थक्क, रितेश देशमुख अन् वाणीला किती मिळाले पैसे?

Raid 2- Star Cast Fees : 'Raid 2' हा चित्रपट आजपासून म्हणजे 1 मे पासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. राज कुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, वाणी कपूर आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचा पहिल्या दिवसांचा रिव्ह्यू देखील आता समोर आला आहे. चाहत्यांकडून चित्रपटातील त्यांच्या अभिनेत्यांची कामगिरी पाहून खुश झाले आहेत.

Raid 2 Film Review

रेड-2 विषयी चाहत्यांकडून काय मिळताय कमेंट?

अभिनेता अजय देवगन पुन्हा मोठ्या पडद्यावर स्वतःचं वर्चस्व गाजवण्यासाठी आजपासून आला आहे. भ्रष्टाचार आणि सत्ता मिळण्यासाठी प्रयत्नात असलेल्या राजकारणी व्यक्तींसोबत लढताना अजय देवगनचा रेड-2 चित्रपट चांगलाच गाजत आहे. 'रेड' च्या यशानंतर, अजय देवगन 'रेड' च्या सिक्वेलमध्ये आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत परतला आहे.

सिनेमात अभिनेता रितेश देखमुख याने देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सिनेमात रितेशने दादाभाईंच्या भूमिकेत दिसत आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त 'रेड 2' सिनेमाची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर चित्रपट प्रेमी आता रेड-2 विषयी बोलत आहेत. एक युझर्स म्हणाला- 'रेड 2′ एका रचनात्मक सिनेमा आहे. सिनेमात अजय देवगन, रितेश देशमुख, सौरभ शुक्ला, सुप्रिया पाठक आणि वाणी कपूर यांनी जबरदस्त काम केलं आहे. दुसरा एक नेटकरी म्हणाला, 'अजन देवगन जेव्हा पंचलाईन बोलतो तेव्हा अभिनेता त्याच्या डोळ्यांनी फार काही बोलून जातो, हे खास आहे.

अजय देवगन, रितेशला किती मिळाले पैसे?

रेड-2 चित्रपटासाठी अजय देवगनने सुमारे 30 कोटी रुपये मानधन मिळाले आहे. या अभिनेत्याची ही फी असल्याचे सांगितले जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, चित्रपटातील अन्य कलाकारांना म्हणावी तितकी फी मिळालेली नाही.

'रेड २' मध्ये रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी त्याला 4 कोटी रुपये देण्यात आले आहेत, जे मुख्य अभिनेता अजय देवगणपेक्षा खूपच कमी आहे.

यावेळी चित्रपटात वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे. यासाठी तिला 2 कोटी रुपये मानधन मिळाले. रेड 2 मध्ये सौरभ शुक्ला देखील एक दमदार भूमिका साकारताना दिसत आहे. ज्यासाठी निर्मात्यांनी त्यांना 35 लाख रुपये दिले आहेत.

या व्यतिरिक्त अभिनेत्री गायत्री अय्यर देखील अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाचा भाग आहे, ज्यासाठी तिला 25 लाख रुपये देण्यात आले आहेत. या चित्रपटात रजत कपूर देखील आहेत. यासाठी त्याने निर्मात्यांकडून 35 लाख रुपये घेतले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+