बापरे! अजय देवगणकडे तब्बल 84 कोटींचे खासगी विमान? खरं काय, अभिनेत्याने केला 'हा' खुलासा
Raid 2 Ajay Devgn : अजय देवगण एक चतूरस्त्र अभिनेता, तो जेवढा शांत तेवढाच संयमी आणि आक्रमकही आहे. त्याच्या चित्रपटातील साकारलेल्या भुमिकेचे ह गुण आहेत, त्याने आतापर्यंत अनेक ब्लाॅकबस्टर सिनेमे केले. जमीन, सिंघम, दृष्यम् आणि आता रेड 2 अशी त्याच्या धमाकेदार चित्रपटांची मालिकाच आहे, पण अलिकडे अजय देवगण पुन्हा एका खास गोष्टींमुळे चर्चेत आला आहे.

अजय देवगणकडे विमान आहे का?
होय अजय देवगण विमान खरेदी करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. या आताच्या चर्चा नाही. 2010 सालापासून ही चर्चा होती की, अजय देवगण याने 84 कोटींचे विमान खरेदी केले. यावर अजय देवगणकडून अधिकृत माहिती प्राप्त झाली नव्हती ना त्याने या विषयावर कधी आपली भूमिका मांडली.. त्यामुळे ही केवळ चर्चा तर नाही असेही अनेक सिनेरसिकांना वाटत होते, तेव्हापासून रसिकांना याचे कुतूहूल होते, पण आता याबाबतीत सर्व माहिती समोर आली आहे.
अजय देवगणने दूर केला सम्रंभ
दिग्गज अभिनेता अजय देवगणचा रेड 2 सध्या प्रदर्शित झाला आहे. बुक माय शोच्या एका मुलाखतीत अजय देवगणने यावर स्पष्टता दिली आहे. इतक्या वर्षानंतर जे कुतूहूल लोकांच्या मनात होते आणि अजय देवगणकडे खासगी विमान आहे का याचा सम्रंभ होता तो आता खुद्द अजय देवगणनेच दूर केला आहे.
काय म्हणाला दिग्गज अभिनेता अजय देवगण?
आपल्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर अजय देवगण म्हणाला की, "नाही मी विमान खरेदी केलेले नाही..होय पण मी विमान खरेदी करण्याचा प्लॅन तयार करत होतो, एक डिलही मिळवली होती पण नंतर ती होऊ शकली नाही. त्यामुळे मी विमान खरेदी केले हे खरे नाही."
पहिल्या दिवशी रेड 2 ने जमवला 18.25 कोटींचा गल्ला
वनइंडिया हिंदीने रेड 2 च्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल sacnilk.com च्या अहवालानुसार, माहिती दिली की, 'रेड 2' ने पहिल्या दिवशी 18.25 कोटी रुपये कमावले आहेत.पहिल्या दिवशी रेड 2 ला चांगली सुरुवात मिळाली आहे. अशा परिस्थितीत, चित्रपटाची कमाई प्रचंड वाढू शकते, अशी सिनेतज्ज्ञांना वाटते.
हा चित्रपट संजय दत्तच्या 'द भूतनी' चित्रपटाशी टक्कर देतो. आता कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या चित्रपटाला हरवतो हे पाहणे बाकी आहे. 2 तास 30 मिनिटांचा हा चित्रपट असून तो U/A प्रमाणपत्रासह थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'रेड 2' ने त्याचे डिजिटल हक्क ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला विकले आहेत.












Click it and Unblock the Notifications