पुष्पा 2 चा जलवा कायम, 27व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, जाणून घ्या किती कोटींचा गल्ला जमवला
Pushpa 2 Box Office Collection Day 27: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट प्रदर्शित होऊन 27 दिवस झाले तरी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दररोज वाढ होत आहे. या चित्रपटाने इतर कोणत्याही चित्रपटाला थिएटरमध्ये टिकून राहण्याची संधी दिली नाही.
27 दिवसानंतरही चित्रपटाची प्रचंड क्रेझ
या चित्रपटाने 27 व्या दिवशीही जबरदस्त कमाई केली आहे. ज्या प्रमाणे चित्रपटाची दररोजची कमाई पाहता हा चित्रपट लवकरच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1200 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करेल. 27 दिवसांनंतरही लोकांमध्ये या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे.

पुष्पा 2 कमाईची घौडदौड सुरुच
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार चौथ्या मंगळवारी चित्रपटाने 7.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने हिंदीमध्ये 6.25 कोटी रुपये, तेलगूमध्ये 1.17 कोटी रुपये, तामिळमध्ये 0.2 कोटी रुपये, कन्नडमध्ये 0.02 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 0.01 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
1200 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री होणार
27 व्या दिवशी चित्रपटाने एकूण 7.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशा परिस्थितीत पुष्पा 2 ची आतापर्यंतची एकूण कमाई 1171.45 कोटी रुपये झाली आहे. चित्रपटाची कमाई अशीच सुरू राहिली तर लवकरच हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1200 कोटींहून अधिक कमाई करेल. या चित्रपटाने 26 व्या दिवशी 6.8 कोटींचा व्यवसाय केला आहे. 25व्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 15.65 कोटी रुपये होते. बॉक्सऑफिसवर 'पुष्पा 2' चा बोलबाला पहिल्या दिवसापासून अबाधित आहे.
बॉक्स ऑफिसवर पुष्पा 2 चा बोलबाला
या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फाजील यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटात जबरदस्त ॲक्शन आणि इमोशन पाहायला मिळत आहे. हा चित्रपट साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुकुमार यांनी बनवला आहे.












Click it and Unblock the Notifications