Pushpa 2 :'पुष्पा 2 ने 12 व्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई! आकडे वाचून व्हाल थक्क, केला हा विक्रम
Pushpa 2 the rule box office collection day 12 : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 900 कोटींचा आकडा पार केला आहे. 'पुष्पा 2' ने 'KGF Chapter 2' चा विक्रम मोडला आणि प्रचंड कमाईसोबतच या चित्रपटाने अनेक नवे विक्रमही रचले आहेत.
कन्नड ब्लाॅकबस्टर 'KGF चॅप्टर 2' चा विक्रम मोडीत
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' ने कन्नड चित्रपट सुपरस्टारच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'KGF चॅप्टर 2' चा आजीवन बॉक्स ऑफिस कलेक्शन (859.7 कोटी रुपये) चा विक्रमही मोडला आहे. 5 डिसेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाची क्रेझ दुसऱ्या आठवड्यात वाढत आहे.

पुष्पा 2 ची दुसऱ्या आठवड्यातही क्रेझ
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फाजील यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असून दुसऱ्या आठवड्यातही त्याची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. कन्नड ब्लाॅकबस्टर चित्रपट केजीएफ चॅप्टर 2 चा चॅप्टरच पुष्पा 2 ने संपवला. आता या चित्रपटाने नवा आजीवन बाॅक्स ऑफीसवरील कमाईचा नवा अध्याय जोडला आहे.
'पुष्पा 2'च्या पहिल्या आठवड्याची दमदार कमाई
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'पुष्पा 2: द रुल'ने पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपयांची कमाई केली होती.
- 9व्या दिवशी 36.4 कोटींची कमाई झाली.
- याशिवाय 10व्या दिवशी कलेक्शन 63.3 कोटी रुपये होते
- 11व्या दिवशी पुष्पा 2 ची कमाई 76.6 कोटी रुपये होती.
12व्या दिवशी इतके कोटींची कमाई केली
- 'पुष्पा 2: द रुल' ने रिलीजच्या 12व्या दिवशी 27.75 कोटींची कमाई केली आहे.
- यासह, 12 दिवसांत 'पुष्पा 2: द रुल'ची एकूण कमाई आता 929.25 कोटींवर पोहोचली आहे.
पुष्पा 2 ची कोणत्या भाषेत किती झाली कमाई
- पुष्पा 2 ने 12 दिवसांत तेलुगूमध्ये 287.05 कोटी रुपये कमाई केली.
- हिंदीमध्ये 573.1 कोटी रुपये कमाई केली.
- तामिळमध्ये 49.4 कोटी रुपये कमाई केली.
- कन्नडमध्ये 6.7 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 13.6 कोटी रुपये कमावले आहेत.
हिंदीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा
'पुष्पा 2: द रुल' हा हिंदीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे आणि त्याने 12 व्या दिवशी चांगली कमाई केली आहे. दुसऱ्या रविवारच्या तुलनेत दुसऱ्या सोमवारी त्याच्या कलेक्शनमध्ये घट झाली असली तरीही 'पुष्पा 2: द रुल'ने 12व्या दिवशी सर्व भाषांमध्ये 27.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हिंदी भाषेत या चित्रपटाने 12 व्या दिवशी 21 कोटींची कमाई केली आहे. यासह हा चित्रपट हिंदीत सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.












Click it and Unblock the Notifications