Pushpa 2 new song Kissik released : 'पुष्पा -2 : द रुल' या चित्रपटाची चाहते आतुरनेने प्रतीक्षा करत आहेत. अशातच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या चित्रपटातील एक गाणं रिलीज झालं असून ते इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
Mythri Movie Makers ने चित्रपटातील 'Kissik' हे नवीन गाणे रिलीज केले आहे. या गाण्यात आयकॉन स्टार अल्लू अर्जुन आणि श्रीलीला यांचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे. प्रोमोपासून या गाण्याची वाट चाहत्यांकडून केली जात होती. आता अखेर हे गाणे रिलीज झाले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते अल्लू अर्जुन आणि श्रीलीला यांची जोडी या गाण्यात दिसत आहे. या गाण्यात दोघांचा दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला. गाण्यात श्रीलीलाचे जबरदस्त आकर्षण, बोल्ड एनर्जी आणि सुंदर पण दमदार डान्स मूव्ह्स पाहायला मिळतात. अल्लू अर्जुन पुन्हा एकदा पुष्पराजच्या भूमिकेत आपली जबरदस्त ऊर्जा दाखवत आहे.
या चित्रपटातील या गाण्यामध्ये हाय ऊर्जा डान्स मूव्ह आणि आकर्षक साउंडट्रॅकमुळे चर्चा आहे. देवीश्री प्रसाद यांच्या संगीताने तयार झालेल्या या गाण्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अल्लू अर्जुन आणि श्रीलीला या जोडीने गाण्यात जीव ओतला आहे. पुष्पा फ्रँचायझीचा पहिला भाग ब्लॉकबस्टर ठरला आणि आता पुष्पा 2: द रुल कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा गगनाला भिडल्या आहेत. 'किसिक' हे गाणे चित्रपटाचे खास आकर्षण मानले जात असून, ते नक्कीच ब्लॉकबास्टर ठरणार आहे.
5 डिसेंबरला प्रदर्शित होणार चित्रपट
5 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल देखील मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची निर्मिती Mythri Movie Makers आणि Sukumar Writings यांच्या बॅनरखाली झाली आहे, तर संगीत T-Series ने हाताळले आहे.