'पुष्पा 2' ने RRR अन् KGF 2 ला मागे टाकले; सर्व विक्रम मोडले, किती झाली आतापर्यंत कमाई
Pushpa 2 Box Office Collection : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटानं रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर नुसताच कल्ला घातला आहे. तर पुष्पा 2 चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्व बड्या चेहऱ्यांच्या, दिग्गजांच्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले.
आरआरआर आणि केजीएफ-2 चित्रपटांच्या कमाईचे रेकॉर्ड देखील पुष्पाने मोडले असून अनेक रेकॉर्ड पुन्हा मोडीत काढणार आहे. चला तर जाणून घेऊया पुष्पा-2 ने गेल्या सात दिवसांत किती कमाई केली अन् कोणते रेकॉर्ड मोडीत काढले. तर पुष्पा चित्रपटाची कमाई ही आठ दिवसांत एक हजार कोटींच्या वरती गेलेली आहे.

पुष्पा 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन
बॉक्स ऑफिसवर पुष्पा 2 ने कहर घातला आहे. या चित्रपटानं रिलीजच्या केवळ सात दिवसांतच भल्या भल्या दिग्गजांना आणि त्यांच्या चित्रपटाला मागे टाकले. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पुष्पा 2 नं रिलीजच्या एक दिवस आधीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये अनेकांचे रेकॉर्ड मोडीत काढले. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये पुष्पा 2 नं एक दिवस आधी 10.65 कोटी रुपये कमावले होते.
RRR आणि KGF चॅप्टर 2 यांचे रेकॉर्ड मोडले
पुष्पा 2 नं रिलीजच्या 8 व्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 700 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या प्रकरणातही या चित्रपटानं विक्रम केला आहे. यापूर्वी, सर्वात जलद 700 कोटी रुपये ओलांडणारे RRR आणि KGF 2 होते, ज्यांनी रिलीजच्या 17 व्या दिवशी 700 कोटींचा टप्पा ओलांडला होता.
तर आता पुष्पा 2 नं अवघ्या 8 दिवसांत म्हणजेच, दोन्ही चित्रपटांच्या तुलनेत फक्त आणि फक्त अर्ध्या दिवसांत हा आकडा पार केला आहे.
दिवस कलेक्शन (रुपयांमध्ये)
पहिला दिवस - 164.25
दुसरा दिवस - 93.8
तिसरा दिवस - 119.25
चौथा दिवस - 141.5
पाचवा दिवस - 64.45
सहावा दिवस - 51.55
सातवा दिवस - 43.35
आठवा दिवस - 37.40
एकूण कमाई किती- 725.75
(या आकडेवारीत बदल होऊ शकतो, बॉक्स ऑफिसवरील कमाईची माहिती अद्याप समोर आलेली नाही)












Click it and Unblock the Notifications