Pushpa 2' ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये रचला इतिहास, जाणून घ्या किती केली कमाई
Pushpa 2 Advance Booking: दाक्षिणात्यातील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2' उद्या म्हणजेच 5 डिसेंबर 2024 गुरुवार रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
या सिनेमाची सर्वत्र प्रचंड क्रेझ सर्वत्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत ॲडव्हान्स बुकिंगमध्येच चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत या चित्रपटाने रामचरण आणि ज्युनियर एनटीआरच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'आरआरआर'ला मागे टाकल्याचे वृत्त समोर येत आहे.

दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक सुकुमार यांच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाविषयी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास रचू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ॲडव्हान्स बुकिंगमध्येच हा चित्रपट मोठ्या विक्रमाची नोंद करत आहे.
ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 77.16 कोटीची कमाई
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'पुष्पा 2: द रुल'च्या पहिल्याच दिवशी आतापर्यंत 21 लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. यासह, पुष्पा 2 ने सुरुवातीच्या दिवसासाठी ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत सुमारे 63 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ब्लॉक केलेल्या सीट्ससह चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंगमधील एकूण कमाई 77.16 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
'पुष्पा 2'ने 'आरआरआर' चित्रपटाला टाकले मागे
पुष्पा 2 च्या ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शनने एस.एस राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'RRR' ला मागे टाकले आहे.'RRR' चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 58.73 कोटी रुपयांची कमाई केली होती. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये BookMyShow ॲपवर 1 दशलक्षाहून अधिक तिकिटे विकणारा हा चित्रपट सर्वात वेगवान चित्रपट ठरला आहे.
चित्रपट विश्लेषकांचे म्हणणे आहे की अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाचे बंपर ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शन पाहता हा चित्रपट त्याच्या ओपनिंग वीकेंडमध्ये 200 कोटींहून अधिक कमाई करू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार 'पुष्पा 2'हा चित्रपट 5 डिसेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात रिलीज होत आहे.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य









Click it and Unblock the Notifications