Pushpa 2: 14 व्या दिवशी 'पुष्पा 2' ने असा रचला इतिहास ,कमाई ऐकूण तुम्हाला बसेल धक्का
Pushpa 2 Box Office Collection Day 14: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः हिंदी पट्ट्यात 'पुष्पा 2' ने बक्कळ कमाई आहे. हिंदी भाषेतही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट तमिळ, तेलगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट इतर भाषांच्या तुलनेत हिंदी भाषेत सर्वोत्तम कामगिरी करत आहे. रिलीज होऊन दोन आठवडे पूर्ण झाले तरीही त्याची क्रेझ अजून ही कायम आहे. या चित्रपटाच्या कथेचे लोक खूप कौतुक करत आहेत.
'पुष्पा 2' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
'पुष्पा 2' चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात हिंदी भाषेत 425.1 कोटींची कमाई केली होती. यानंतर या चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी हिंदीमध्ये 27 कोटी रुपये, दुसऱ्या शनिवारी 46 कोटी रुपये, दुसऱ्या रविवारी 54 कोटी रुपये, दुसऱ्या सोमवारी 20.5 कोटी रुपये आणि दुसऱ्या मंगळवारी 18.5 कोटी रुपये कमावले आहेत.
'पुष्पा 2' ची रेकॉर्डब्रेक कमाई
आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 14व्या दिवसाच्या दुसऱ्या बुधवारी कमाईचे आकडे समोर आले आहेत. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' ने हिंदी भाषेत 14 व्या दिवशी 18 कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह, 'पुष्पा 2'चे हिंदी भाषेतील 14 दिवसांचे एकूण कलेक्शन 607.35 कोटी रुपये झाले आहे. 14 दिवसांत 'पुष्पा 2' ची सर्व भाषांमध्ये एकूण जागतिक कमाई 1400 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
'पुष्पा 2' ने असा रचला इतिहास
'पुष्पा 2' ने 14 व्या दिवशी दोन मोठे यश संपादन केले आहे. जिथे हा चित्रपट 14व्या दिवशी जवळपास 18 कोटींची कमाई करत हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. तसेच या चित्रपटाने अभिनेता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या स्त्री 2 या चित्रपटच्या आजीवन कलेक्शनला 597.99 मागे टाकले आहे.












Click it and Unblock the Notifications