प्रियांका चोप्राच्या भावाचे लग्न; सिद्धार्थला कशी मिळाली त्याची जीवनसंगिनी, कोण आहे वधू नीलम?
बॉलिवूड तथा हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सद्या भारतात आहे. ती तिच्या भावाच्या लग्नासाठी भारतात आलेली आहे. आज त्याच्या लग्नाला प्रारंभ झालेला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून प्रियांका व तिच्या कुटुंबियांच्या वतीने भावाच्या लग्नाची तयारी सुरू आहे.
भाऊ व वहिणीच्या प्रेमाविषयी बोलली प्रियांका?
नीलम आणि सिद्धार्थची प्रेमकथा खूप फिल्मी आहे. एका मुलाखतीत, प्रियांकाने तिच्या भावाच्या आणि वहिनीच्या भेटीबद्दल आणि डेटिंग अॅप्सवरील प्रेमाबद्दल सांगितले होते. प्रियांकाने सांगितले की सिद्धार्थ आणि नीलम एका डेटिंग अॅपवर भेटले आणि त्यानंतर गोष्ट थेट लग्नापर्यंत पोहोचली.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात आहे. ती तिचा भाऊ सिद्धार्थच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आली आहे. प्रियांकाचा भाऊ आणि चित्रपट निर्माता सिद्धार्थ चोप्रा हा दक्षिणेतील अभिनेत्री नीलम चोप्रासोबत लग्न बंधनात अडकणार आहे. नीलम ही साऊथ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे, तथापि, नीलम गेल्या काही काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. प्रियांकाने घरी सुरू असलेल्या लग्नाच्या तयारीचे फोटो शेअर केले आहेत.

नीलम आणि सिद्धार्थची लव्हस्टोरी फिल्मीस्टाईल?
नीलम आणि सिद्धार्थची प्रेमकथा खूपच फिल्मी आहे. एका वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने तिच्या भावाच्या आणि वहिनीच्या भेटीबद्दल आणि डेटिंग अॅप्सवरील प्रेमाबद्दलच्या तिच्या विचारांबद्दल मोकळेपणाने सांगितले. प्रियांकाने सांगितले की सिद्धार्थ आणि नीलम एका डेटिंग अॅपवर भेटले आणि त्यानंतर गोष्टी लग्नाच्या टप्प्यावर ते दोघे पोहोचले. ती म्हणाली की, माझा भाऊ आणि वहिनी एकत्र खूप गोंडस दिसतात.
डेटिंग अॅपवर प्रियांकाचे मत काय?
प्रियांका चोप्रा हीने एका मुलाखतीत डेटिंग अॅपबाबत मत व्यक्त केले. ती म्हणाली की, तिचा पती निकला भेटण्यापूर्वी तिने कधीही कोणतेही डेटिंग अॅप वापरले नव्हते. तिला या अॅपची संकल्पना समजत नाही कारण तिला असे वाटले की जो व्यक्ती तिच्या आयुष्यात तिचा जीवनसाथी म्हणून आला तो कोणत्याही डेटिंग अॅपद्वारे नाही तर नैसर्गिकरित्या, स्वतःहून आला होता. प्रियांका म्हणाली की तिला वाटते की ती या बाबतीत खूप जुन्या पद्धतीची आहे.
2024 मध्ये झाला होता साखरपुडा
प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ आणि नीलम यांचा साखरपुडा 2024 मध्ये झालेला आहे. आता त्यांच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. सिद्धार्थ-नीलमचा साखरपुडा 2 एप्रिल 2024 रोजी मुंबईत झाला. प्रियांकाने तिच्या भावाच्या आणि वहिनीच्या समारंभाचे फोटोही शेअर केले. प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सद्या एस.एस. राजामौली यांच्या 'एसएसएमबी २९' चित्रपटाच्या शूटिंगसाठी भारतात आहे. या चित्रपटात प्रियांका साऊथ सुपरस्टार महेश बाबूसोबत काम करत आहे.












Click it and Unblock the Notifications